Home | National | Other State | Punjab, Khanna, Wife's Murder, Sensational Disclosure, Mystery

मुलं होत नव्हते म्हणून पत्नीला केले टॉर्चर, एके दिवशी सासरी फोन करून सांगितले- हार्ट अटॅकने तुमची मुलगी गेली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2019, 04:23 PM IST

गळ्यावरील निशान पाहून आला संशय

  • Punjab, Khanna, Wife's Murder, Sensational Disclosure, Mystery

    खन्ना(पंजाब)- लग्नाच्या तीन वर्षानंतरी मुलं झाले नाही म्हणून येथील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मुलगा होत नाही म्हणून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर सासरी फोन करून हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. पण गळ्यावरील निशानाने पतीचा पोलखोल केली आणि पोलिसांनी त्याला अटक केले.


    - 20 वर्षीय किरणजीत कौरचे लग्न 19 जून, 2016 ला गुरमीत सिंगसोबत झाले होते. लग्नाच्या तीन वर्षानंतरही तिला मुलं होत नव्हते म्हणून गुरमीत तिला टॉर्चर करू लागला.

    - महिलेची वडील देसराज सिंगने सांगितले की, काही दिवसांपूर्वी गुरमीतने तिला मारहाण केल्याचे तिने फोनवर सांगितले होते.

    - त्यानंतर 13 एप्रिलला गुरमीतचा फोन आला की, हार्ट अटॅकने किरणजीतचा मृत्यू झाला, पण तिच्या गळ्यावरील निशान पाहून आम्हाला संशय आला आणि पोलिसांना सुचना दिली.

Trending