आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब पोलिस एएसआयचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; पोलिसांची अब्रू मलिन करण्याच्या आरोपात एएसआयला अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बटाला (गुरदासपूर) - बटाला पोलिसच्या एका एएसआयचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिस प्रशासन हैराण झाले आहे. बॉबी शर्मा असे या एएसआयचे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 


काही दिवसांपूर्वीच झाली होती बढती 
व्हिडिओत दिसणारा एएसआय बॉबी शर्मा अगोदर पोलिस ठाण्यात लिपिक पदावर कार्यरत होता आणि आता त्याला एएसआय पदावर बढती देण्यात आली होती. शर्मासोबत असलेली महिला पोलिसांसोबत तैनात असणारी होमगार्ड असल्याचे सांगितले जात होते. पण पोलिसांनी याबाबत स्पष्ट नकार दिला आहे. 


अश्लील फिल्म बनवणे आणि ती पसरवणे बाबत गुन्हा दाखल
सोमवारी सायंकाळी व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर व्हायरल झाला. पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळली असता संपूर्ण बटाला पोलिस हैराण झाले. शहरातील एका तसल्या हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेले अडीच मिनिटांचे दोन आणि दीड मिनिटाची एक क्लिप सोशल मीडियावर फिरत होती. महिलेसोबत निर्वस्त्र होऊन अश्लील चाळे करणाऱ्या एएसआय बॉबी शर्माने स्वतःच्या मोबाइलने स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. 


महिलेचा पोलिसांशी काहीही संबंध नाही -  एसएचओ
याबाबत एसएचओ मुख्त्यार सिंह यांनी सांगितले की, व्हिडिओ समोर येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली. सदरील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस शिस्तीचा भंग केल्याचे दिसून आले. यामुळे एएसआय बॉबी शर्मा विरोधात कठोर कारवाई करत त्याच्याविरोधात आयटी अॅक्ट आणि अश्लील फिल्म बनवणे तसेच ती पसरवणे या आरोपांत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्त्यार सिंह पुढे बोलताना म्हणाले की, व्हिडिओत दिसणारी महिला पोलिस किंवा होमगार्ड कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण वास्तविकतेमध्ये या महिलेचा पोलिस किंवा होमगार्डशी कोणताही संबंध नाही. महिला एक साधारण नागरिक असून याचा तपास डीएसपी सिटीने केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...