आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjabi Song Makhna Sung By Honey Singh, Neha Kakkar, Singhsta, Pinaki, Sean And Allistair

यो यो हनी सिंगचे नवीन गाणे 'मखना' रिलीज, काही तासांतच 36 लाखांहून अधिक लोकांनी बघितले, गाण्यासाठी 10 महिने वाढवले केस तेव्हा झाली नवीन हेअर स्टाइल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः यो यो हनी सिंगचे नवीन गाणे 'मखना' रिलीज झाले आहे. रिलीज होताच काही तासांतच हे गाणे 36 लाखांहून अधिक लोकांनी बघितले. या गाण्याचे चित्रीकरण क्युबा येथे झाले. या गाण्यात हनी सिंगने लॅटिन मुळाच्या रेगेटन बीट्सच्या टचचा वापर केला आहे. हे गाणे एक कार्निवल फिल देणारे आहे. हा फिल देण्यासाठी प्यूर्टो, रिको आणि कोलंबियासारख्या लॅटिन देशांची निवड शूटिंगसाठी करण्यात आली होती. अखेर हे गाणे क्युबा येथे चित्रीत करण्यात आले.  मखना हे गाणे स्पॅनिश डायरेक्‍टर डॅनियल दुर्रेनने दिग्दर्शित  केले असून याच्या चित्रीकरणाला सात महिन्यांचा कालावधी लागला. हनी सिंगचे हे नवीन गाणे टी-सीरीजने रिलीज केले आहे.

 

हनी सिंग गेल्या अनेक दिवसांपासून ब्रेकवर होता. या व्हिडिओतो तो नवीन लूकमध्ये दिसतोय. यासाठी त्याने 10 महिने केस वाढवले आणि नवीन हेअरस्टाइल केली आहे.  गेल्या दोन वर्षांत हनी त्याच्या तब्येतीकडे लक्ष देत होता. प्रकृती उत्तम झाल्यानंतर त्याने गाण्यावर काम सुरु केले. दीर्घ काळानंतर हनी 1 डिसेंबर रोजी दीपिका-रणवीर सिंगच्या रिसेप्शनमध्ये दिसला होता. वाढलेल्या वजनामुळे त्याला यावेळी ओळखणे कठीण झाले होते. यावर्षाच्या सुरुवातीलाच हनी सिंगने दिल चोरी साडा हो गया आणि छोटे छोटे पेग हे दोन चार्टबस्टर साँग रिलीज केले होते. याशिवाय यो यो हनी सिंगने 'द पार्टी इज ओवर नाउ', 'रंगतारी' आणि 'बिलेनियर'सारख्या पार्टी साँग्सने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...