आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Punjab's Driver, Parminder, Will Get Rs 49.9 Lakh From The Supreme Court's Order After Ten Years

१८ शस्त्रक्रिया, डोके चेपलेले, गळ्यावर जखम, डावी बाजू निकामी तरीही हिंमत कायम, म्हटले, आधी ओझे होतो..आता साथ देईन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीरकपूर - २००९ मध्ये रस्ते अपघातात पंजाबचे तत्कालिन मंत्री कॅप्टन कंवलजीतसिंग यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांची कार परमजितसिंग चालवत होता. तोही अपघातात गंभीर जखमी झाला होता. अनेक वर्षे अंथरूणाला खिळून हाेता. त्याला अन्न-पाणीसुद्धा गळ्यात बसवलेल्या नळीने दिले जात होते. त्याला तीन वर्षे बोलता येत नव्हते. परंतु परमिंदर व त्याच्या कुटुंबियांनी हिंमत सोडली नाही. या गरीब कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला. ढकौली येथील रहिवाशी परमिंदर असहाय होता. तरीही त्याने कायदेशीर लढाई सुरू ठेवली होती. अपघातानंतर नुुकसान भरपाईसाठी लढा दिला. परमिंदरच्या वतीने त्याच्या कुटुंबियांनी ट्रक चालक व त्यांचे मालक तसेच विमा कंपनीवर खटला दाखल केला. सुरुवातीच्या निर्णयात पंचकुलाच्या लवादाने विमा कंपनीस दहा लाख ४३ हजार ६६६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने वाढवून २१ लाख ६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. तेव्हा कंपनीने इतकी नुकसानभरपाई देण्याचे नाकारले. नंतर परमिंदर सर्वोच्च न्यायालयात गेला. या प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. नुकसान भरपाई २१ लाखांवरून ५० लाख देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने म्हटले, कारला धडक देणाऱ्या दोन्ही ट्रक चालकांकडे वैध परवाना नव्हता. या आधारे विमा कंपनी नुकसान भरपाई देण्याचे टाळू शकत नाही. त्याच्या आईने देवाघरी उशीर लागतो पण न्याय मिळतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

बहीण हरप्रीत कौर...

भावाला खाऊ घालणे, आंघोळ घालणे, उठवून बसवणे आदी सर्व कामे करते. भावाला खंबीरपणे साथ देणारी एकुलती एक बहिण. घरखर्च भागविण्यासाठी ट्यूशन घेते. लग्न केले नाही. नोकरी नाही. एक क्षणही भावाला सोडून राहात नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा ती म्हणते, मला भावाला एकटे सोडून कोठेही जायचे नाही. मला लग्नही नको. 

 

परमिंदर सिंह...

२२ वर्षाचा असताना रस्ते अपघातात जखमी झाला. १८ शस्त्रक्रिया झाल्या. डोक्याचा उजवा भाग पूर्णत: चेपला गेला होता. स्वत: उठू शकत नाही. बसू शकत नाही. त्यासाठी आधार लागतो. आता काही पावलेच टाकू शकतो. 
> ३ वर्षे बोलता येत नव्हते. लिहून दाखवत असे. 
> ६ वर्षे पुन्हा बरा होईल, आपल्याला दुचाकी चालवता येईल, म्हणून त्याने दुचाकीही विकली नव्हती. 

 

जजसमोर बेशुद्ध पडला होता...

१० वर्षे खटला चालला. परमिंदरला स्वत:चे कपडेही घालता येत नाहीत. तरीही कुटुुंबाने विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी संघर्ष सोडला नाही. तीन वेळा परमिंदर स्वत: सर्वाेच्च न्यायालयात गेला. एकदा सुनावणी सुरू असताना, तो न्यायाधीशांसमोरच बेशुद्ध झाला होता. न्यायालयाने त्याचे दु:ख समजून घेतले व नुकसानभरपाई वाढवली. 

बातम्या आणखी आहेत...