आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याच्या पाच पिलांचे डोके कापले, चामडी सोलली आणि फेकूण दिले, समोर आले हे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - येथे परिधिवडा ओल्ड सिटीमध्ये कुत्र्याच्या पाच पिलांचे मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी काहींचे शीर कापलेले आढळून आले. स्थानिकांच्या मते एखाद्याने दारुच्या नशेत कुत्र्याच्या पिलांना मारले असावे. पोलिसांनी संशयावरून एकाला अटकही केली आहे. पण कुत्र्याला नेमके कोणी आणि कशासाठी मारले असेल याबाबत अद्याप काही ठोस हाती आलेले नाही. 


सारखी भुंकत होती कुत्री 
स्थानिकांनी सांगितले की, सकाळच्या वेळी टनलजवळ एक कुत्री सारखी भुंकत होती. ती बराच वेळ ओरडत राहिली तेव्हा काही लोक त्याठिकाणी गेले,तेव्हा समोरचे चित्र अगदी बीभत्स होते. त्याठिकाणी कुत्र्याच्या पाच पिलांचे शीर कापलेले शरीर पडलेले होते. काही कुत्र्यांचे तर तुकडे तुकडे करून फेकलेले होते. 

  
एका कुत्र्याची चामडी सोलली 
कुत्र्याच्या पिलांना अत्यंत निर्घृणपणे मारण्यात आले होते. एका पिलाची तर चामडी सोलण्यात आली होती. एवढेच नाही तर स्थानिक लोकांच्या मते याठिकाणी जवळच सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता. आरोपींनी कोणाला ओळख पटू नये म्हणून त्याच्या ताराही कापल्या. लोकांनी पाईपातून कुत्र्यांच्या पिलांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी त्यांची आई जवळ शांतपणे बसून होती. 

 
दारुड्यावर संशय 
एका व्यक्तीने सांगितले की, घटनेच्या दिनशी त्याने एका दारुड्याला कुत्र्याच्या पिलांबरोबर पाहिले होते. पण तोपर्यंत सर्वकाही नॉर्मल होते. काही लोकांच्या मते रात्री कुत्रे दारुड्यावर ओरडले असतील त्यानंतर त्याने असे कृत्य केले असेल. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...