आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांचे स्वच्छ मन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणत: 1998 ची गोष्ट आहे. बीड येथे दीनदयाळ शोध संस्थानचे कलावर्ग आणि पाळणाघर गोकुळ हे एका इमारतीत चालत असे. पाठकताई व पाठककाका तिथेच राहत होते. त्या दिवशी माझा कलावर्ग आटोपून आम्ही सगळे ऑफिसमध्ये बोलत होतो. तेवढ्यात आतून आभा आली. तिने भय्याजवळ येऊन तक्रार केली की, शौनक व प्रथमेश दोघं खोड्या करीत आहेत. तुम्ही त्यांना रागवा. ही सर्वच मुले 4 - 5 वर्षांची होती. आभाने बहुधा त्यांना पुन्हा आतमध्ये जाऊन सांगितले की, पाठककाका आता तुम्हाला शिक्षा करणार आहेत. थोड्या वेळाने ते दोघे जण ऑफिसात आले.‘काका.. काका.. तुम्ही आम्हाला टप्पू देणार आहात का? काय शिक्षा देणार आम्हाला?’ आम्ही सर्व जण गप्पांमध्ये होतो. पटकन काय ते कळेचना. काकांनी त्यांना विचारले, तुम्ही खोड्या केल्यात का? दोघंही हो म्हणाली. त्यांनी नेमके काय केले, त्यांच्यात काय घडले याची चौकशी केली व मुलांना म्हणालो, ‘तुम्ही खोडी काढलीत ना?


मग कान पकडून दहा उठा-बशा काढा’ दोघांनीही कान पकडून उठा-बशा काढल्या आणि ते खेळायला
पळालेदेखील. आम्ही सगळे जण हसू लागलो. या प्रसंगावरून वाटले. किती निर्व्याजपणे दोघांनीही आपापल्या चुका कबूल केल्या व त्यासाठी दिलेली शिक्षा मान्य करून ते सहजतेने मोकळे झाले. प्रामाणिकपणे चूक कबूल करण्याचे धाडस त्यांच्यात लहानपणी दिसले. ते तसेच टिकले पाहिजे, असे वाटले. लहान मुलांचे मन स्वच्छ, निर्मळ असते. मोठी माणसे इतकी सहजता का दाखवू शकत नाहीत? ते त्यांच्या हातून चूक झाली तरीही सहजासहजी कबूल करत नाहीत. त्याची शिक्षा भोगणे तर पुढची गोष्ट. मुलांवर चांगले संस्कार करत असल्याचे समाधान त्यातून
आम्हाला मिळाले.