आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चुकूनही अशा पुरोहितांकडून करून घेऊ नये पूजा, जाणून घ्या या खास गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा, यज्ञ, हवन करताना विविध गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पूजा करण्याच्या मुहूर्तापासून ते सामग्रीपर्यंत सर्व गोष्टींची निवड खूप विचार करून करावी लागते. परंतु फार कमी लोकंना हे माहिती असावे की, पूजा किंवा यज्ञ करून घेण्यासाठी कोणत्या पुरोहितांची निवड करावी आणि कोणाची करू नये. या संदर्भात गरुड पुराणात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. येथे जाणून घ्या, पूजा करताना पुरोहित किंवा ब्राह्मण कसा असावा...


- जादूटोणा किंवा तंत्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीकडून कधीही यज्ञ, पूजन किंवा श्राद्ध कर्म करून घेऊ नये. यामुळे नरक प्राप्त होतो.


- ज्या व्यक्तीने वेदाचे पठण केले नसेल, पैसे कमावण्याच्या हव्यासाने पूजा करणाऱ्या व्यक्तीकडून पूजा-यज्ञ केल्यास त्याचे फळ मिळत नाही.


- इतरांचा आनंद पाहून जळणारे, किंवा सोन्याचे दागिने विकणाऱ्या पुरोहिताकडून पूजा, यज्ञ करून घेणे चुकीचे मानले जाते.


- बहिरा, मुका, क्रोध करणारा, काळे दात असलेला, दिसायला विद्रुप असलेल्या पुरोहिताकडून यज्ञ, पूजन कर्म करून घेणे वर्ज्य आहे.


- पापी लोकांशी मैत्री करणारे आणि शनिदेवाचे दान घेणाऱ्या पुरोहिताकडून चुकूनही करून घेऊ नये पूजा आणि यज्ञ.


- इतरांचे धन मागणारे, खोट बोलणारे, हिंसा करणाऱ्या पुरोहितांकडून पूजा करून घेऊ नये. यांचे दोष आपल्याला लागतात.


- स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या आणि परस्त्रीसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरोहिताकडून पूजा करून घेऊ नये. असे केल्याने पाप लागते.


- नेहमी इतरांची निंदा करणाऱ्या आणि व्यसनी पुरोहिताकडून पूजन कर्म करून घेतल्यास नरकाची प्राप्ती होते.

बातम्या आणखी आहेत...