Home | Divya Marathi Special | purushottam khedekar-book-ban-demand

पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी

सुधीर सूर्यवंशी | Update - May 25, 2011, 11:55 AM IST

जेम्स लेन या अमेरिकी लेखकावर टीका करणा:या पुरुषोत्तम खेडेकर या मराठी लेखकाने शिवरायांची बदनामी करणारे आणि ब्राह्मणांवर आक्षेपार्ह असे लिखाण केले. त्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी मराठी लेखकांकडून होत आहे.

 • purushottam khedekar-book-ban-demand

  जेम्स लेन या अमेरिकी लेखकावर टीका करणा:या पुरुषोत्तम खेडेकर या मराठी लेखकाने शिवरायांची बदनामी करणारे आणि ब्राह्मणांवर आक्षेपार्ह असे लिखाण केले. त्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी मराठी लेखकांकडून होत आहे.

  अमेरिकी लेखक जेम्स लेन यांनी शिवरायांवर लिहिलेल्या पुस्तकावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आक्षेप घेऊन त्या पुस्तकावर राज्य सरकारला बंदी घालावयास लावली होती. त्या पुस्तकात लेन यांनी शिवाजी महाराजांची मानहानी होईल, असे लिखाण केले होते. तसेच लेन यांनी ब्राह्मणांबद्दल आणि त्यांच्या बायकांबद्दल अपमानकारक गोष्टी या पुस्तकात लिहिल्या होत्या.

  खेडेकर यांचे हे पुस्तक मागील महिन्यात प्रकाशित झाले. या पुस्तकात खेडेकर यांनी, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात झालेल्या जातीय दंगलींना ब्राह्मणांनी हवा दिली. या अपमानाचा बदला ब्राह्मणेेतरांनी घ्यायला पाहिजे, असे म्हटले आहे.

  एम. डी. रामटेके, ए. एन आंबेडकर त्यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे की, आपण खेडेकर आणि त्यांच्या ब्राह्मणांच्या विरोधातील आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. त्यांनी अशाच प्रकारचे लिखाण चालू ठेवले तर लेखकांची प्रतिमा नक्कीच मलिन होईल. आंबेडकर यांनी राज्य सरकारला या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

  अशी अपमानकारक भाषा कोणत्याही बुद्धिमान लेखकाकडून वापरली जात नाही, अशी टीका फुले-आंबेडकर तत्त्ववादी लेखक डॉ. हरी नरके यांनी केली आहे.

  पश्चात्ताप नाही
  या प्रकारच्या लिखाणाबद्दल त्यांना अजिबात पश्चात्ताप नाही. 'मी जे काही लिहिले ते सत्यच आहे. यासाठी कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. या लिखाणावर शंका असणा:यांनी आधी रामायण आणि महाभारतातील चुकीच्या लिखाणावर आक्षेप घ्यावा त्यानंतर माझ्या लिखाणावर आक्षेप घ्यावाÓ, असे खेडेकर यांनी म्हटले आहे.

Trending