आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Pushpa Joshi, Who Debuted At The Age Of 82 From The Film 'Raid', The Director Wrote You Will Be Missed A Lot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय देवगणच्या 'रेड'मध्ये झळकलेल्या 85 वर्षीय पुष्पा जोशींचे निधन, 'स्वॅगवाली दादी' नावाने होत्या प्रसिद्ध

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 2018 मध्ये रिलीज झालेल्या अजय देवगणच्या रेड या चित्रपटात झळकलेल्या 85 वर्षीय पुष्पा जोशी यांचे निधन झाले आहे. 26 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. पुष्पा यांनी ‘रेड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी अभिनेता सौरभ शुक्लाच्या आईची भूमिका साकारली होती. 'रेड' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी पुष्पा जोशींसोबतचे एक छायाचित्र शेअर करुन एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. 

तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल... 
राजकुमार यांनी लिहिले, ‘पुष्पा जोशी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले. माझ्या ‘रेड’ चित्रपटात तुम्हाला भूमिका साकारताना पाहणे माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. तुम्ही जिथे असाल, तिथे आनंद देत असाल.’ 

शेवटच्या काळात त्यांनी  ‘फेवीक्विक’च्या जाहिरातीमध्ये देखील काम केले होते. या चित्रपटानंतर त्या ‘स्वॅग वाली दादी’ म्हणून लोकप्रिय झाल्या होत्या.