आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निकाल/ जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव, नेतन्याहू म्हणाले - हा तर महान लोकशाहीचा विजय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली -  लोकसभा निवडणूकीतील विजयाबाबत जगभरातील नेते पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत आहेत. यामध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, इज्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 


नेतन्याहूंनी मोदींना शुभेच्छा देत लिहिले की, 'माझे मित्र नरेंद्र मोदी, तुम्हाला या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा. हा निकाल पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील तुमचे नेतृत्व सिद्ध करतात. आपण सोबत मिळून भारत आणि इज्राइलमधील मैत्रीपूर्ण संबंध आणखी घनिष्ट करूयात.'

 


 

जिनपिंग यांनी पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी मोदींना पत्र लिहून एनडीएच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. यामध्ये जिनपिंग मोदींसोबत मिळून भारत आणि चीनमधील नातेसंबंध दृढ करणार असल्याचे म्हटले आहे. अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी ट्वीट केले की, अफगानिस्तान सरकार आणि नागरिक दोन लोकशाहीमधील सहकार्य वाढवण्याची इच्छा बाळगत आहेत. 

 

 

श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी मोदींना दिल्या शानदार विजयाबद्दल शुभेच्छा
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि भूटानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी फोन करून मोदींच्या या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी मोदींच्या या शानदार विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. पुढे दोन देशांसोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.