बॅडमिंटन / वर्ल्ड चँपियन झाल्यानंतर मायदेशी परतली पीव्ही सिंधू, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट


वर्ल्ड चँपियनशिप जिंकणारी सिंधू पहिली भारतीय आहे

Sep 17,2019 01:59:25 PM IST

स्पोर्ट डेस्क- स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू वर्ल्ड चँपियनशिप जिंकून मायदेशी परतली आहे. वर्ल्ड चँपियनशिप्समध्ये गोल्ड मेडल आपल्या नावावर करणारी सिंधून पहिली भारतीय खेळाडू आहे. हा ऐतिहासीक विजय मिळवून परतलेल्या सिंधुने आज(मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली.

नरेंद्र मोदींनी सिंधुच्या गळ्यात सुवर्ण पदक घातले
सिंधू वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय आहे. या प्रसंगी सिंधुसोबत तिचे कोच पुलेला गोपीचंद आणि क्रिडामंत्री किरण रिजिजूदेखील उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी सिंधूच्या गळ्यात सुवर्ण पदक घातले.

X