आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यावधींची मालकिन आहे 'गोल्डन गर्ल' पीव्ही सिंधू; एका दिवसात कमवते 1.5 कोटी, जाणून घ्या काय आहे तिच्या कमाईचे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- वर्ल्ड चँपियनशिपमध्ये भारतासाठी पहिले गोल्ड जिंकणारी भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू आता गोल्डन गर्ल नावाने ओळखली जाऊ लागली आहे. सध्या सिंधू सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. वर्ल्ड चँपियनशिपच्या फायनलमध्ये तिने जापानच्या नोजोमी ओकुहाराला 21-7, 21-7 या फरकाने पराभूत करुन टूर्नामेंटमध्ये विजय मिळवला. ही पहलीच वेळ आहे, जेव्हा एखाद्या भारतीयाने वर्ल्ड चँपियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. सिंधू फक्त खेळाच्या मैदानावरच गोल्डन गर्ल नाहीये, तर कामाईच्या बाबतीत ती अवल्ल स्थानावर आहे.

फॉर्ब्‍सच्या लिस्‍टमध्ये 13 व्या नंबरवर आहे सिंधू
फॉर्ब्‍सच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सिधू एकमात्र भारतीय खेळाडू आहे. जगात कमाईच्या बाबतीत ती 13 व्या स्थानावर आहे. सिंधुने मागील वर्षी 55 लाख डॉलर म्हणजेच अंदाजे 39 कोटी रुपये जाहिराती आणि टूर्नामेंटमधील प्राइज मनी जिंकून कमवले होते. सिंधू जाहिरातीसाठी एक दिवालाला 1 ते 1.5 कोटी रुपये चार्ज करते.

जाहिरातीतून झाली 5 मिलिअन डॉलरची कमाई
सिंधुने 50 लाख डॉलरची कमाई फक्त जाहिरातीतून, तर 5 लाख डॉलर प्राइज मनी जिंकून कमावले आहेत. एकूण तिची कमाई 55 लाख डॉलर म्हणजेच 39,62,24,400 रुपये आहे. सिंधुला फोर्ब्सने मोस्ट मार्केटेबल महिला खेळाडूनच्या लिस्टमध्ये सामील केले.


सिंधुची सर्वात जास्त कमाई एंडोर्समेंटमधून होते. ती सध्या बँक ऑफ बड़ौदा, ब्रिजस्टोन, जेबीएल, पॅनासोनिक आणि इतर अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करते. फॉर्ब्‍सने सिंधुबद्दल लिहीले, 'सिंधु भारताची मोस्‍ट मार्केटेबल महिला खेळाडू.' 

किती आहे नेट वर्थ
सिंधुची बहुतेक कमाई एंडोर्समेंट आणि स्पॉन्सरशिपमधून होते. पण, त्याशिवाय 2016 मध्ये सिल्वर मेडल जिंकल्यामुळे तिला तेलंगाना सरकारकडून 5 कोटी रुपये बक्षीस मिळाले. त्याशिवाय आंध्र प्रदेश सरकारकडून 3 आणि दिल्ली सरकारकडून 2 कोटी रुपये मिळाले. त्याशिवाय तिला मध्य प्रदेश, हरियाणा, स्पोर्ट्स मिनिस्ट्री आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून 50-50 लाख रुपये मिळाले. तसेच इंडियन ऑलिंपिक असोसिएशनकडून 30 लाख आणि भारत पेट्रोलियम कॉरपोरेशनकडून 75 लाख रुपये मिळाले. एकूण पीव्ही सिंधुची नेट वर्थ 10 मिलियन डॉलर म्हणजेच 72 कोटी रुपये आहे.

कमी वयात पद्मश्री
सिंधु पद्मश्री अवार्ड जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू आहे. तिला हा पुरस्कार 2015 मध्ये मिळाला आहे. त्या आधी तिला अर्जुन अवार्ड आणि राजीव गांधी खेळरत्नही मिळाला आहे.