Home | Sports | Other Sports | PV Sindhu loses final to carolina Marin in world Badminton Championship

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पिनशिप: सिंधू दुसऱ्यांदा उपविजेती; दाेन वर्षांत सातवी फायनल गमावली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 06, 2018, 08:37 AM IST

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली पी.व्ही. सिंधू सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपविजेती ठरली.

  • PV Sindhu loses final to carolina Marin in world Badminton Championship

    नानजिंग (चीन)- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली पी.व्ही. सिंधू सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपविजेती ठरली. तिला रविवारी या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यातून तिची सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याची संधी हुकली. कॅराेलिना मरीनने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूला पराभूत केले. तिने ४५ मिनिटांत २१-१९, २१-१० ने मात केली. सामना जिंकला. तिने तीन वर्षांनंतर तिसऱ्यांदा हा किताब अापल्या नावे केला. सिंधूचे हे एकुण चाैथे अाणि दुसरे राैप्यपदक ठरले.


    सिंधूचा फायनलमधील सातवा पराभव
    रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या सिंधूला गत दाेन वर्षांपासून फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागत अाहे. हीच पराभवाची मालिका खंडित करण्याचा तिचा अाता प्रयत्न हाेता. मात्र, यामध्ये ती सपशेल अपयशी ठरली. तिला २०१६ मध्ये रिअाे अाॅलिम्पिकच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या दाेन वर्षांच्या दरम्यान तिचा सात फायनलमध्ये विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. तिने अापल्या करिअरमधील ही १२ वी फायनल गमावली.

Trending