Home | Sports | Other Sports | PV Sindhu reached in final of world Badminton Championship

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपः सिंधु फायनलमध्ये, सेमिफायनलमध्ये वर्ल्ड नंबर 2 यामागुचीचा पराभव

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 08:23 PM IST

सिंधुने शनिवारी जपानच्या अकाने यामागुची हिला पराभूत करत हे यश मिळवले. यामागुची हिचा सिंधूने 21-16, 24-22 असा पराभव केला.

  • PV Sindhu reached in final of world Badminton Championship

    बीजिंग - वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्या भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु हिने फायनलमध्ये धडक मारली आहे. सिंधुने शनिवारी जपानच्या अकाने यामागुची हिला पराभूत करत हे यश मिळवले. यामागुची हिचा सिंधूने 21-16, 24-22 अशी सरळ सेटमध्ये पराभव केला. फायनलमध्ये सिंधुचा मुकाबला स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे. मारिनने सेमिफायनलमध्ये चीनच्याच बिंगजिआओचा 13-21, 21-16, 21-13 ने पराभव केला.


    13व्या वेळा आमने-सामने येणार सिंधु आणि मारीन
    मारिन आणि सिंधु आतापर्यंत एकमेकींच्या विरोधात 12 वेळा कोर्टात उतरल्या आहेत. दोघींनी एकमेकिंना 6-6 वेळा पराभूत केले आहे. सिंधु आणि मारिन यांच्यात यापूर्वीची मॅच मलेशिया ओपनमध्ये झाली होती. त्यावेळी मारीनने सिंधुला 22-20, 21-19 ने पराभूत केले होते.

Trending