आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Qatar Is One Of The Hottest Country On Earth, They Put AC In The Markets To Avoid Heat

पृथ्वीवरील सर्वात गरम देशांपैकी एक असलेल्या कतारने सार्वजनिक ठिकाणी लावले मोठ-मोठे कुलर आणि एसी, गरमीपासून वाचण्यासाठी रस्त्यांवर केली ब्लू कोटिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा- पृथ्वीवरील सर्वात गरम देशांपैकी एक असलेल्या कतार मधील नागरिकांना जिवघेण्या गर्मी पासून वाचण्यासाठी नव-नवीन प्रयत्न केले जात आहेत. कतरची राजधानी दोहाणध्ये सार्वजनिक ठिकाणांवर, बाजारांमध्ये आणि हॉटेल्समध्ये एअर कंडीशनर लावले जात आहेत. त्यासोबतच तापमान कमी करण्यासाठी रस्त्यांवर ब्लू कोटिंगदेखील केली जात आहे. दोहामध्ये तापमान 46 डिग्री सेंटीग्रेडवर गेल्यामुळे आउटडोर शॉपिंग मॉल्समध्ये मोठ-मोठे कूलर आणि एसी लावले आहेत, म्हणजे बाहेर असलेल्या नागरिकांचे गरमीपासून रक्षण होईल.

दोहामधील सर्वात मोठ्या मार्केट जवळ असलेल्या अब्दुल्ला बिन जासिम स्ट्रीटच्या अडीचशे मीटर लांब रस्त्यावर एक मिमी जाड ब्लू रंगांची चादर टाकण्यात आली आहे. हा रंग काळ्या रंगापेक्षा कमी गरमी शोशून घेतो. त्यामुळे बराच वेळ रस्ता ठंड राहतो. यात विशेष हीट-रिफ्लेक्टिंग पिगमेंटदेखील मिसळण्यात आला आहे. इंजीनियर साद अल-डोसारीने सांगितल्यानुसार, डांबरचे तापमान वास्तविक तापमानापेक्षा 20 डिग्री अधिक असते. इतकच नाही तर, थंड हवा खेळती राहावी, यासाठी बहुतेक रस्ते आणि गल्ल्या उत्तरेकडे तोंड असलेल्या बनवल्या आहेत.दोहा फारसच्या खाडीत प्रायद्वीप असल्यामुळे इतके गरम


दोहा शहर इतके गरम यासाठी आहे की, हे शहर फारसच्या खाडीत प्रायद्वीपवर आहे. येथे पाणीच्या वरच्या भागांचे तापमान 32 डिग्रीच्या आसपास असते, त्यामुळे शहराचे तापमान 46 डिग्रीपर्यंत वाढते.

बातम्या आणखी आहेत...