आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्यूआर कोड आणि बारकोड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात कुठलंही सामान विकत घेतलं की त्या सामानाच्या पॅकिंगच्या मागे क्यूआर कोड आणि बार कोडचं चित्र छापलेलं असतं. जाणून घेऊयात हे तंत्र कसं काम करतं ते.

 

बारकोड
यामधे ० ते ९ पर्यंत अंक असतात. या संख्यांचं प्रतिनिधित्व ७ काळ्या- पांढऱ्या पट्ट्या करत असतात. प्रत्येक संख्येनुसार याची रचना अर्थात पॅटर्न वेगवेगळा असतो. बार कोडच्या सुरूवातीचे पाच अंक निर्माता कंपन्यांचा आयडी क्रमांक असतो. पुढचे पाच अंक संबंधित उत्पादनाची  संख्या. १९७४ मध्ये च्युइंगमच्या पॅकवर बारकोड सर्वप्रथम वापरण्यात आलं होतं. बारकोडच्या प्रत्येक रेषेत वेगवेगळे अंक असतात. हे अंक १ ते ९ या दरम्यानचे कुठलेही असू शकतात. या अंकांपैकी काही काळ्या, तर काही पांढऱ्या रंगात छापलेले असतात.  बारकोडच्या वापरामुळे कुठल्याही उत्पादनाची किंमत, त्याची उत्पादनाची तारीख, समाप्ती तिथी अर्थात एक्सपायरी डेट, वजन याची  माहिती मिळू शकते. क्यूआर कोडच्या तुलनेत बारकोडमध्ये माहिती साठवून ठेवण्याची क्षमता कमी आहे. 

 

क्यूआर कोड
क्यूआर कोडचा वापर सर्वप्रथम जपानच्या कंपन्यांतर्फे करण्यात आला होता. क्यूआर या इंग्रजी आद्याक्षरांचा अर्थ क्विक रिस्पॉन्स अर्थात त्वरित प्रतिसाद असा आहे. संबंधित माहिती त्वरेनं वाचता यावी यासाठी या कोडची निर्मिती करण्यात आली. क्यूआर कोड हे बारकोडचं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच आधुनिक आवृत्ती आहे. बारकोड तुटण्याफाटण्याच्या समस्येमुळे क्यूआर कोडची निर्मिती करण्यात आली. काही विशेष अथवा गुप्त माहिती सांकेतिक शब्दांत बदलण्यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला जातो. 

बातम्या आणखी आहेत...