आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात दुष्काळानंतर आता पूर्व भागात पुराचे संकट, शेकडो लोकांनी घर सोडले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी । ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये जलमय झालेल्या बिसेंटिनल पार्क परिसराचे दृश्य. दुष्काळानंतर ईशान्य ऑस्ट्रेलियात पुरामुळे लोकांचे संकट वाढले आहे. पुरामुळे हजारो लोकांना घर सोडणे भाग पडत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या शतकातील हा सर्वांत मोठा पूर असल्याचे सांगण्यात येते. ऑस्ट्रेलियातील या भागात मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, नुकताच झालेला पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे. 

 

२० हजार घरे जलमय होण्याचा धोका 
ईशान्य क्वीन्सलँडच्या टाऊन्सविले शहरात हजारो रहिवासी खंडित वीजपुरवठ्यात राहत आहेत. पाऊस सुरूच राहिल्यास २० हजारांहून जास्त घरे जलमय होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 

क्वीन्सलँडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र 
क्वीन्सलँड राज्याच्या वरती धिम्या गतीने पुढे जाणारे मान्सून क्षेत्र कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. यामुळे काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या ७२ तासांत हवामान बदलण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...