आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Question Mark On Rahul Gandhi's Visit To Jammu And Kashmir, Administration Banned From Coming Of Any Leaders

राहुल गांधींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, प्रशासनाने कोणत्याही नेत्यांच्या येण्यावर लावली बंदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 9 विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन जम्मू काश्मीरला जाण्याची तयारी केली आहे. मात्र शनिवारच्या त्यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण, जम्मू काश्मीर प्रशासनाने कोणत्याही नेत्याला येण्यास मनाई केली आहे. कलम 370 हटवल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिलाच दौरा आहे, ज्यात ते अनेक नेत्यांना सोबत घेऊन जाणार आहेत. यापूर्वी काही नेत्यांना श्रीनगर विमानतळाहूनच परत पाठवण्यात आले होते.

काश्मीरच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी जाणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. या दौऱ्यात राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, सीपीआयचे डी. राजा, सीपीआयएमचे सीताराम येचुरी, डीएमके नेते, राष्ट्रवादीचे माजिद मेमन, आरजेडीचे मनोज झा यांचा समावेश आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राहुल गांधींना भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.

जम्मू काश्मीर प्रशासनाकडून रेड सिग्नल
राजकीय नेत्यांनी सध्या जम्मू काश्मीरमध्ये येऊ नये, असे आवाहन राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने केले आहे. सरकारकडून लोकांना दहशतवादी आणि फुटीरतावाद्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ज्यात हळूहळू सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठ राजकीय नेत्यांनी सामान्य परिस्थितीमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. राजकीय नेत्यांना विनंती आहे, की त्यांनी श्रीनगरला भेट देऊन इतरांना अडथळा निर्माण करू नये. या नेत्यांकडून सध्या अनेक भागात लागू असलेल्या आदेशांचेही उल्लंघन केले जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, लोकांना सुरक्षित ठेवणे यालाच सध्या महत्त्व दिले जाईल, याची वरिष्ठ नेत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.