सुभाष देशमुख अध्यक्ष / सुभाष देशमुख अध्यक्ष असतानाचे प्रश्न, मंत्री झाल्यावरही कायम!

नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विद्यमान मंत्री सुभाष देशमुख होते. त्या वेळी जे प्रश्न होते, तेच शुक्रवारी सकाळी झालेल्या वार्षिक सभेत पुन्हा आले. मंत्रिपद नसताना श्री. देशमुख सातत्याने म्हणायचे, 'एमअायडीसी'चे विभागीय कार्यालय सांगलीला आहे. ते गैरसोयीचे असून, सोलापूरला आणले पाहिजे. आज त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाची दोन वर्षे उलटली तरी हा प्रश्न सुटलेला नाही. असोसिएशनचे उपाध्यक्ष मनीष देशमुख याबाबत म्हणाले, 'महाराष्ट्र अौद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय सोलापुरात लवकरच सुरू होईल.' परंतु कधी हे अद्यापही निश्चित नाहीच.

Sep 01,2018 11:13:00 AM IST

सोलापूर- नॉर्थ सोलापूर इंडस्ट्रियल असोसिएशनच्या अध्यक्षपदी विद्यमान मंत्री सुभाष देशमुख होते. त्या वेळी जे प्रश्न होते, तेच शुक्रवारी सकाळी झालेल्या वार्षिक सभेत पुन्हा आले. मंत्रिपद नसताना श्री. देशमुख सातत्याने म्हणायचे, 'एमअायडीसी'चे विभागीय कार्यालय सांगलीला आहे. ते गैरसोयीचे असून, सोलापूरला आणले पाहिजे. आज त्यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाची दोन वर्षे उलटली तरी हा प्रश्न सुटलेला नाही. असोसिएशनचे उपाध्यक्ष मनीष देशमुख याबाबत म्हणाले, 'महाराष्ट्र अौद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय सोलापुरात लवकरच सुरू होईल.' परंतु कधी हे अद्यापही निश्चित नाहीच.


सोलापूर इंडस्ट्रीज असाेसिएशनची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी चिंचोळी एमआयडीसीतल्या जयकुमार पाटील सभागृहात झाली. असोसिएशनचे अध्यक्ष एम. केशव रेड्डी अध्यक्षस्थानी होते. गत आर्थिक वर्षातील कामांचा आढावा घेऊन त्यांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी वैयक्तिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. स्वतंत्र पोलिस ठाणे, अग्निशमन व्यवस्था, मुबलक पाणी आणि सांगलीचे विभागीय कार्यालय सोलापूरला आणणे हेच विषय प्रलंबित राहिले आहेत. त्या मार्गी लावण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष डी. राम रेड्डी यांनी सांगितले.


नव्या सभासदांचे स्वागत
संस्थेत दाखल झालेल्या नव्या सदस्यांचे या वेळी स्वागत करण्यात आले. जयपाल महिंद्रकर, जगदीश पटेल आणि दत्तात्रय माने यांना सदस्यत्व देण्यात आले. सोमाणी एव्हरग्रीनच्या ऊर्मिला कुलकर्णी, अॅन्युलाइट सोलरचे प्रकाश शिंदे आणि सप्रेम कोठारी यांनी सभासदांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. रामेश्वरी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव कमलेश शहा यांनी आभार मानले.


खजिनदार वासुदेव बंग यांनी वार्षिक हिशेब पत्रके सादर केली. सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या वेळी उत्तर तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजय पाटील, माेहोळ तालुका ठाण्याचे सूर्यकांत कोकणे उपस्थित होते.

X