आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वी बोर्डाच्या परीक्षेत 'आझाद काश्मीर' बाबत विचारण्यात आले प्रश्न, सोशल मीडियावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोर्डाच्या सामाजिक विज्ञानच्या पेपरमध्ये भारताच्या नकाशात 'आझाद काश्मीर' दर्शविण्यास सांगितले
  • 'आझाद काश्मीर' बाबत विचारलेल्या प्रश्नांमुळे वादाला फुटले तोंड, उत्तरांबाबत विद्यार्थी झाले संभ्रमित

इंदूर - मध्य प्रदेशात 10 वी बोर्डाच्या परीक्षेत 'आझाद काश्मीर'बाबत दोन प्रश्न विचारण्यात आले. यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणी भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान या प्रकरणाचा निषेध म्हणून आगर-मालवा येथे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतळा जाळण्यात आला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या अधिकाऱ्याला हटवण्याचे आदेश दिले आहेत. 10 बोर्डाच्या सामाजिक विज्ञान पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा प्रश्नात 'आझाद काश्मीर'चा पर्याय लिहिला होता. तर दुसऱ्या एका प्रश्नात भारताच्या नकाशामध्ये 'आझाद काश्मीर' दर्शविण्यास सांगण्यात आले. 

सोशल मीडियावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया 


मध्य प्रदेशातील या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नरेंद्र मोदी फॅनने लिहिले की, अरे देवा, मध्य प्रदेशात सलग 15 वर्षे भाजपचे सरकार होते, परंतु परीक्षेत कधीच असा प्रश्न विचारला नाही. काँग्रेसचे सरकार येताच आझाद काश्मीरबाबत प्रश्न विचारले आहेत. काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ. मिथिलेश कुशवाहाने लिहिले की, ही केवळ एक चूक नसून मुद्दाम केलेले कृत्य चूक आहे. हा देशातील सैनिक आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. तर राजीव पटेलने लिहिले की, याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. 
 

बातम्या आणखी आहेत...