आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराजांच्या मृत्यूच्या 6 महिन्यानंतर भक्तांनी उपस्थित केले 8 मोठे प्रश्न; म्हणाले ते आत्महत्या नाही करू शकत, पूर्ण नियोजनाने करण्यात आला त्यांचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - भय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतर पुन्हा चर्चोला उधान आले आहे. महाराष्ट्र, गुजरात येथून आलेल्या भक्तांनी आरोप केला आहे की, भय्यूजींनी आत्महत्या केली नाही तर योग्य प्रकारे नियोजन करून त्यांचा खून करण्यात आला आहे. भक्तांनी पोलिसांना निवदेन देत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या मते, 12 जून रोजी भय्यूजांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सोमवारी सकाळी भय्यू महाराजांच्या सूर्योदय आश्रम येथे बैठक पार पडली. संध्याकाळी वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी डॉ.दत्ता देशमुख, वल्लभ पाठक, शाम देशमुख, तुषार पाटीलसह इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. 


सेवकांची कसून चौकशी का नाही केली - भक्त

भक्तांनी पोलिसांच्या तपासावर आरोप करत सांगितले की, घटनेनंतर पोलिसांनी गृह कलहामुळे महाराजांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. घटनेनंतर डॉ.आयुषी यांना एका दिवसाची सवलत देऊ शकले असते. पण इतर सेवकांची कसून चौकशी केली असती तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या. पण कोणत्याच सेवकाची कसून चौकशी केली नाही. पोलिसांनी भक्तांना कोणतीच माहिती दिली नाही. भक्तांनी आरोप केला आहे की, काही महिन्यांपूर्वी सेवक विनायकसह इतर सेवक बेपत्ता आहेत. ट्रस्टचे लोक महाराष्ट्रातील विनायकच्या घरी गेले होते. पण तो तिथेही सापडला नाही. त्याचा मोबाइल देखील बंद आहे.  

 

यामुळे 6 महिन्यांनंतर केली सीबीआय चौकशी मागणी

श्याम देशमुख या भक्ताच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर पोलिस तपास करत होते. पण 6 महिन्यांनंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. कारण पोलिस बेजबाबदारपणे चौकशी करत आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. याबाबत भक्तगणांनी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना देखील पत्र लिहीले आहे. 

 

भक्तांनी मांडले 8 प्रश्न

> 1- मुलीला आणण्यासाठी एअरपोर्टवर जाणार होते महाराज, ती येण्याच्या आधीच गोळी कशी झाडून घेतली. 


> 2 - 11 जून रोजी रात्री 9.30 वाजता महाराज जेवणानंतर फिरण्यास जाणार होते. बंगल्याच्या गेटवर ड्रायव्हर गाडी घेऊन उभा होता. रात्री 2.30 पर्यंत ड्रायव्हरने महाराजांची वाट पाहिली. अखेर त्यांना बाहेर जाण्यापासून कोणी अडवले होते.  

> 3 - महाराज 15 दिवसांसाठी अज्ञात ठिकाणी जाणार होते. ही माहिती घरातील इतर सदस्यांना कशी मिळाली?

> 4 - महाराज जेव्हाही खोलीत एकटे असत तेव्हा सगळ्यांना सुचना देण्यात येत असे की, त्यांच्या परवानगी शिवाय कोणीही आत जाऊ नये. पण घटनेच्या दिवशी मुलगी कुहू खोलीत बंद होण्याच्या 1-2 तासानंतर दरवाजा का तोडला? कोणाच्या सांगण्यावरून दरवाजा तोडण्यात आला?  तेव्हा तर विधान दिलेल्यांपैकी एकालाही गोळी चालण्याचा आवाज ऐकू आला नाही. 

> 5 - कुहूच्या खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर आतमध्ये कोणते लोक आले होते. विधान दिलेल्यांमध्ये विसंगती का?

> 6 - रूग्णालयात नेल्यानंतर लगेच कथित सुसाइड नोट सोशल मिडीयावर व्हायरल झाली. असे कोणी आणि केले? दुसऱ्या दिवशी सुसाइड नोटचे आणखी एक पेज व्हायरल का करण्यात आले? पोलिस सुसाइड नोट व्हायरल करणाऱ्याचा तपास का घेऊ शकली नाही?

> 7 - महाराजांनी बंदूक लोड-अनलोड करता येत नव्हती. कोठे जाताना ते आपल्यासोबत पिस्तुल ठेवत होते. पण घरी आल्यावर सेवकाकडे पिस्तुल अनलोड करून पिस्तुल वेगळ्या खोलीत तर काडतून वेगळ्या खोलीत ठेवत होते. याची माहिती महाराजांना देखील देण्यात येत नव्हती.

> 8 - घटनेच्या दिवशी त्यांनी स्वतःहून पिस्तुल मागितले होते पण त्यांचा कोठेही कार्यक्रम नव्हता. तरीही त्यांना कोणी पिस्तुल दिले? काही दिवसांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या सेवकाकडून घरात पिस्तुल ठेवल्याची माहिती घेण्यात आली होती. ही माहिती कोणी आणि का घेतली? 

 

पत्नी डॉ. आयुषींनी नाही दिली साथ

> 2 डिसेंबर रोजी सकाळी आश्रमावरील बैठकीनंतर भक्तगण महाराजांची पत्नी डॉ.आयुषी यांना सोबत घेऊन पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार होते. पण डॉ.आयुषी त्यांच्यासोबत नाही गेल्या. पदाधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेल्या विनंती अर्जावरही त्यांचे नाव नाहीये. पण त्यांचे समर्थन असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. आयुषी यांची सुद्धा सीबीआयद्वारे तपास व्हावा अशी इच्छा होती.  

 

>सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी सांगितले की, दत्त जयंतीपर्यंत महाराजांच्या समाधीचे काम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. घर आणि आश्रमातील महाराजांच्या वस्तुंना आश्रमात ठेवण्यात येणार आहे. तसेच तेथे महारांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...