आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल जिओग्राफिकच्या मेगा आयकॉन्स सिरीजचे सूत्रसंचालन करणार आर. माधवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क:  अभिनेता आर. माधवन नुकताच अॅमेझॉन प्राइमवर वेब सिरीज ब्रीद मध्ये दिसला होता. ही सिरीज मानसिक नाट्यावर आधारित होती. माधवनने यात मुख्य भूमिका केली होती. आता तो मेगा आयकॉन्स सिरीजचे सूत्रसंचालन करणार आहे.. 

 

अभिनेता आर. माधवन लवकरच नॅशनल जिओग्राफिकच्या आगामी सिरीज मेगा आयकॉन्स होस्ट करताना दिसणार आहे. ही सिरीज देशातील प्रसिद्ध लोकांवर आधारित आहे. या शोमध्ये वेगळ्या क्षेत्रातील काही प्रभावी लोकांविषयी सांगण्यात येईल. यात पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, आध्यात्मिक गुरू आणि नोबेल पुरस्कार विजेता दलाई लामा, भारताची पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी, क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता कमल हसनसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये प्रसारित होणाऱ्या या शोच्या प्रीमियरमध्ये विराट कोहलीचा जीवनपट दाखवण्यात येईल. प्रत्येक भागात या पाच दिग्गजांच्या जीवनाविषयी दाखवण्यात येईल. या सिरीजमध्ये माधवन काही तज्ज्ञांची मदतदेखील घेणार आहे. या दिग्गजांनी कसे ध्येय गाठले, त्यांनी कशी मेहनत घेतली, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, हे सर्व ते सांगणार आहेत. या मालिकेतून या दिग्गजांच्या जीवनाविषयी दाखवण्यात येईल. त्यांनी अनेकांना प्रभावित केले. 

 

याविषयी माधवन म्हणाले... आपण विराटच्या खेळाचा आनंद घेत असतो. पडद्यावर कमल हसनचा अभिनयदेखील पाहतो. या लोकांना पाहत असताना, हे लोक इतके महान कसे झाले, असा विचारही येतो. खरचं महान होण्यासाठीच या लोकांचा जन्म झाला होता का ? त्यांचे यश पहिल्या दिवसांपसूनच ठरले होते का ? आम्ही या मालिकेतून त्यांच्या जीवनाला सन्मान देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी चॅनलसोबत काम करण्यास उत्सुक आहे. कोणत्या गोष्टीमुळे हे दिग्गज महान झाले, याविषयी सांगणार आहे. 

 

प्रॉडक्शन हेड श्रुती तकुलिया म्हणाली... 
'या शोच्या माध्यमातून आम्ही या दिग्गजांच्या जीवनातील काही छुप्या पैलूंना दाखवणार आहोत. शिवाय जीनियस जन्म घेतात की बनतात ? या प्रश्नाचे उत्तरही शोधत आहोत. माधवन याचे सूत्रसंचालन करणार याचा आम्हाला आनंद आहे. त्याने अनेक शो होस्ट केले आहेत. त्याने अनेक भाषांत काम केले आहे. यासाठी त्याला धन्यवाद. 

बातम्या आणखी आहेत...