Home | News | R Madhvan got shaved after 2 years on mothers day

आर माधवनने आईच्या आग्रहास्तव दोन वर्षानंतर केली दाढी , आता फ्रांसमध्ये करणार या चित्रपटाचे शुटींग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 04:32 PM IST

रॉकेट्रीत एका इस्त्रोच्या माजी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार मॅडी

 • R Madhvan got shaved after 2 years on mothers day


  बॉलिवूड डेस्क - आर. माधवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे, यात तो क्लिन शेवमध्ये दिसतोय. त्याने या फोटोत एक कॅप्शन देऊन लिहिले की, माझ्या आईने सांगितले म्हणून दोन वर्षांनी मी दाढी केली आहे. यामागचे खरे कारण म्हणजे आर. माधवन वैज्ञानिक ''नम्बी नारायणन'' यांच्या जीवनावरील 'रॉकेट्री' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. म्हणून त्याने दोन वर्षापासून दाढी केली नव्हती.


  मदर्स डे आईला दिले खास गिफ्ट
  माधवन आपल्या चॉकलेटी लुकमुळे ओळखला जातो. पण या चित्रपटामुळे त्याला दोन वर्षापासून दाढी करताच आली नाही. पण आता चित्रपटाच्या मुख्य पात्राचे शुटींग पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. माधवनच्या या अवतारामुळे आईने त्याला अनेक वेळेस सुनावले होते. अखेर आईच्या या आग्रहास्तव माधवने दाढी करून आपल्या आईला मदर्स-डे चे हे खास गिफ्ट दिले.


  प्रोस्थेटिक मेकअपशिवाय केला लूक
  माधवने नम्बी यांच्या लुकसाठी तब्बल 96 किलो वजन वाढवले होते. आणि यासाठी त्याने कोणत्याही प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घेतला नाही. विशेष म्हणजे फक्त 12 दिवसातच त्याने वजन कमी केले आणि उर्वरित कामासाठी परतला आहे. आता मॅडी तरूण नम्बी यांचे पात्र शुटींग करण्यासाठी फ्रान्सला जाणार आहे. रॉकेट्री हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू अशा तीन भाषेत प्रदर्शित होणार आहे.

  कोण आहेत नम्बी नारायण
  नम्बी भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेतील (इस्रो) क्रायोजेनिक्स विभागात वरिष्ठ अधिकारी प्रभारी होते. त्यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपात 1994 मध्ये अटक करण्यात आली होती. पण 1996 साली सीबीआयद्वारे त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाने 1998 साली त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

 • R Madhvan got shaved after 2 years on mothers day
 • R Madhvan got shaved after 2 years on mothers day
 • R Madhvan got shaved after 2 years on mothers day

Trending