आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लग्नानंतरही वयाच्या 71 व्या वर्षी एकटी आयुष्य व्यतित करत आहे ही बॉलिवूड अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रात्री या 71 वर्षांच्या झाल्या आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी बंगाल येथे जन्मलेल्या राखी यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. राखी यांनी आपल्या करिअरमध्ये यशोशिखर गाठले, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक चढउतार पाहिले. दोन लग्नानंतरही वयाच्या 71 व्या वर्षी त्यांच्यावर एकटे आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. राखी यांचे पहिले लग्न वयाच्या 16 व्या वर्षी बंगाली पत्रकार अजय बिश्वाससोबत झाले होते. 1963 साली दोघांचे लग्न झाले, पण दोन वर्षांतच म्हणजे 1965 साली ते विभक्त झाले. त्यानंतर 1973 मध्ये राखी यांनी गुलजार यांच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर यांच्याही नात्यात कटुता निर्माण झाली. लग्नानंतरची काही वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघे विभक्त झाले, पण अद्याप त्यांचा घटस्फोट झाला नाही.

 

गुलजार यांनी केली होती राखी यांना बेदम मारहाण... 

प्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी एका रात्री राखी यांना हॉटेलच्या रुममध्ये इतकी मारहाण केली होती की, राखी यांचे पूर्ण शरीर नीळे पडले होते. पिंकविला बेवसाईटच्या 'फ्लॅशबॅक फ्राइडे: अ नाइट विच चेंज्ड गुलजार-राखी मॅरेज' या आर्टीकलमध्ये असे लिहीण्यात आले आहे. गुलजार यांनी अभिनेत्री राखीसोबत 15 मे 1973 रोजी दुसरे लग्न केले होते. गुलजार यांना राखी यांनी चित्रपटात काम करु नये अशी इच्छा होती. 13 डिसेंबर 1973 साली मुलीच्या जन्मानंतर दोघांनी वेगळे राहायला सुरुवात केली. 

 

असे काय घडले होते त्या रात्री जेव्हा गुलजार यांनी केली राखीला बेदम मारहाण..
- एकदा गुलजार आंधी चित्रपटाच्या शूटिंगसाठी 1975 साली एका चांगल्या लोकेशनच्या शोधात होते. त्यावेळी राखीही त्यांच्यासोबत होत्या. गुलजार नेहमी त्यांच्या कामात व्यस्त असत त्यामुळे राखी एकट्या बसून बसून बोअर होऊन जात असे.

- काश्मिरमध्ये असताना एकदा सुचित्रा सेन आणि संजीव कुमार पार्टी करत होते. त्यावेळी संजीव कुमार हे दारुच्या नशेत होते.
- यानंतर सुचित्रा जेव्हा त्यांच्या रुममध्ये जाण्यासाठी निघाल्या तेव्हा संजीव कुमारने सुचित्राचा हात पकडला आणि त्यांना स्वतःजवळ ओढू लागले. हे सर्व पाहून गुलजार सुचित्राला वाचविण्यासाठी पळाले. गुलजार यांनी खूप मेहनत करुन सुचित्रा यांना संजीव कुमारपासून वाचविले.

- यानंतर गुलजार सुचित्राला रुमपर्यंत सोडवून येत होते तेव्हा राखीने त्यांना तेथून बाहेर निघताना पाहिले
- राखी तिथेच गुलजार यांना जाब विचारु लागल्या. यामुळे हॉटेलमध्ये स्टाफची गर्दी जमा होऊ लागली. 
- राखी यांना जाणून घ्यायचे होते की गुलजार सुचित्राला सोडवायला रुमपर्यंत का गेले, ही गोष्ट पसरू नये म्हणून गुलजार यांनी ते सांगण्याचे टाळले आणि 

तिथेच राखी यांचा गोंधळ सुरु झाला.
- सर्वांसमोर झालेला तमाशा पाहून गुलजार यांना फार राग आला आणि त्यांनी राखीला हॉटेलच्या रुममध्ये नेऊन खूप मारहाण केली. त्यानंतर स्वतः गुलजार हॉटेलच्या रुममध्ये नशेमध्ये पडले होते.

 

दुसऱ्या दिवशी गुलजार यांना न विचारता राखीने साईन केला 'कभी कभी'

- दुसऱ्या दिवशीच राखी यश चोप्रा यांना जाऊन भेटली जे कभी-कभी’ (1976) च्या शूटिंगसाठी लोकेशनसाठी काश्मीर येथेच होते. 
- यश चोप्रा यांना वाटत होते की राखी यांनी चित्रपटात काम करावे, यासाठी ते गुलजार यांनी परवानगीही मागायला गेले पण खुद्द राखीनेच येऊन चित्रपटात 

काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे यश चोप्रा यांनी राखीला साईने केले. 
- असे म्हणतात, की यामुळेच गुलजार नाराज झाले आणि कदाचित हेच कारण असावे की गुलजार आणि राखी वेगळे झाले.
- गुलजार आणि राखी यांनी घटस्फोट घेतला नाही पण ते वेगळे राहतात.

 

राखीलाही चित्रपटात घ्यायचे नाही गुलजार..

राखी यांना चित्रपटात काम करण्यासाठी अनेक प्रपोजल येत असत पण जेव्हा राखी चित्रपटात काम न करु देण्याचे कारण विचारत असे तेव्हा गुलजार नाराज होते असत. यामुळेच त्या दोघांमध्ये लहान-मोठे वाद होत असत.

 

एकटेपणाला कंटाळ्ल्या होत्या राखी 
गुलजार यांचा चित्रपटात काम करण्याला विरोध होता त्यामुळे राखी यांनी लग्नानंतर एकही चित्रपट साईन केला नव्हता. गुलजार त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असत, त्यामुळे राखी यांना फार एकटेपणा जाणवत असे.

 

'दिल का रिश्ता' होता शेवटचा चित्रपट..
'दिल का रिश्ता' हा 2003 साली आलेल्या चित्रपटात राखीने भूमिका केली होती. त्यानंतर त्या कोणत्याच चित्रपटात दिसल्या नाही. राखी यांनी त्यांचा डेब्यू बंगाली चित्रपट 'बधू बरन' (1967) द्वारे केला होता. तर 1970 साली आलेला 'जीवन मृत्यु' मधून त्यांनी हिंदी डेब्यु केला. यात राखीसोबत धर्मेंद्र यांनी काम केले होते. 

बातम्या आणखी आहेत...