आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ महर्षी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकेदिवशी वाटे कर्णाला जावं जी, पांडवांच्या महाली जावं जी
सत्कार केला कर्णाचा धन्य महाराज जी, कर्णाला पाहून द्रौपदीस वाटे लाज जी
झाली सर्द-गर्द, कामोन्नत देह चळलं, कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं...

 

 

‘जांभूळ आख्यान' रंगात आलेलं असायचं आणि बाबांची (गोंधळ महर्षी राजारामबापू कदम) द्रौपदीही. पाच पांडव असताना सहाव्या पांडवावर मन आलेली द्रौपदी बाबा असे काही सादर करायचे की, वाटायचं कर्ण आताच हिच्या रंगमहाली येऊन गेलाय. द्रौपदी सैरभैर झालीय. द्रौपदीच्या रूपातला त्यांचा नखरा, मुरका, आवेग असा भन्नाट असायचा, पाहणाऱ्याला वाटायचं खरीखुरी द्रौपदीच अवतरलीय भूतलावर. द्रौपदीच्या साऱ्या भावावस्थांतलं भावकाम बाबा अप्रतिम साकारायचे. कर्णावर भाळलेली, त्याच्याशी संग करण्याची इच्छा बाळगणारी, कृष्णाने तिचं हे गुपित जाणल्यावर लज्जित होणारी, दृष्टान्तकथेतून पुन्हा शील परत मिळवणारी... याच कसबामुळे १९८६ मध्ये वयाच्या १०५ व्या वर्षीही त्यांनी पॅरिसच्या आयफेल टॉवरखाली गोंधळ घातला तेव्हा फ्रान्सचे तेव्हाचे पंतप्रधान मितराँदेखील भारावून गेले होते. त्यांनी बाबांना घट्ट मिठीच मारली. माझा जन्म १९२०चा. मोठा झालो तो घरी-दारी गोंधळ पाहतच. दिवस मावळताच बाबा, त्यांच्या साथीदारांची लगबग सुरू व्हायची. सगळ्यांची कामं ठरलेली असायची. त्यांच्या गडबडीतच माझी धावपळ सुरू असायची. त्यांच्या मागे धावणारा. ते सादर करतात त्याची नक्कल करणारा. बाबाही कौतुकाने पाहायचे. त्यांची हरेक नकल शिकवायचे. मोठेपणी त्यांच्याबरोबर उभा राहिलो. त्यांच्या रंगा-ढंगाशी एकरूप झालो. त्यांची द्रौपदी माझ्यात वास्तव्याला आली. माझ्या स्वभावानुसार बहरू, नाचू लागली. बघणारे म्हणायचे बाप कोण नि लेक कोण तेच कळत नाही. मला बरं वाटायचं. पण वाटायचं आपलं कसब ‘आपलं' नाही, ते बाबांचं आहे. त्यांनी दाखवलेली द्रौपदीच आपण साकारतोय. मग मीपण तिला माझ्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही. तिला यथेच्छ राहू दिलं. वेळ येताच तिला पुढच्या पिढीकडे सोपवलं. आता माझा मुलगा जांभूळ आख्यान आणि द्रौपदी सादर करतो. 
 

- राधाकृष्ण कदम 

बातम्या आणखी आहेत...