आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब थोरात हे माझे हायकमांड नाहीत, जे सांगायचे ते पक्षश्रेष्ठींना सांगेन : राधाकृष्ण विखे    

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - ‘भाजपत जाण्याचा माझ्या मुलगा सुजयने घेतलेला निर्णय त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, त्याने मला हा निर्णय घेताना विचारलेही नाही.  तरीही मी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून घेईन,’ असे विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मला स्पष्टीकरण मागणारे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काही हायकमांड नाहीत. त्यांच्याकडे स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही. जे सांगायचं ते मी पक्षाच्या नेत्यांकडे सांगेन. तसेच वेळ आल्यानंतर थोरात यांच्या पक्षनिष्ठेबद्दलसुद्धा बोलेन’, असा इशाराही त्यांनी दिला.  


लोकसभेच्या उमेदवारीसाठी मुलाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे राजीनामा देणार असल्याची चर्चा हाेती. त्यावर तूर्त त्यांनी पडदा टाकला आहे. ‘अहमदनगर मतदारसंघातील आघाडीत अदलाबदल करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेकदा चर्चा झाली होती. कायम पराभव होत असलेल्या मतदारसंघाची अदलाबदल व्हावी, असे आमचे म्हणणे होते. त्या निकषावरच आम्ही काँग्रेससाठी अहमदनगरची जागा मागत होतो. मात्र, जिल्ह्यातील दोन्ही जागा काँग्रेसकडे नको, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. खरे तर नाशिक, औरंगाबादमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. तसेच इथेही चालले असते, उलट आघाडीचा एक खासदार वाढला असता. मात्र राष्ट्रवादीने ताठर भूमिका घेतल्यामुळे सुजयने भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला,’ असे विखे म्हणाले.  

बातम्या आणखी आहेत...