आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचे मनाेमिलन; आघाडीत बिघाडी, नगर मतदारसंघात ना राष्ट्रवादीचा प्रचार ना सुजयचा : विखेंचा पवित्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेली चार-साडेचार वर्षे भांड-भांड भांडलेल्या शिवसेना-भाजपने एेन निवडणुकीच्या ताेंडावर जुळवून घेतले. दाेन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी युतीतील कार्यकर्त्यांच्या मनाेमिलनासाठी पुढाकार घेत मेळाव्याचेही आयाेजन केले आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी विदर्भातून हाेत आहे, तर दुसरीकडे भाजप सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी गेले वर्षभर एकत्रित रणनीती आखणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकीला मात्र निवडणुकीच्या ताेंडावर तडे जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डाॅ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगर जिल्ह्यात काँग्रेसला माेठा धक्का बसला आहे. त्यासाेबतच गुरुवारी स्वत: राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचार न करण्याची जाहीर भूमिका घेतली आहे.


पवारांच्या मनात द्वेष, मग कशाला करायचा प्रचार? 
राष्ट्रवादीने नगर काँग्रेससाठी साेडण्यास नकार दिल्याने सुजय भाजपत गेला. शरद पवारांनीही आमच्या दिवंगत वडिलांवर टीका केली. विखे कुटुंबाबद्दल त्यांच्या मनात अजूनही द्वेष आहे. मग राष्ट्रवादीचा प्रचार कशाला, असे सांगून काेणाचाही प्रचार करणार नसल्याचे विखे म्हणाले. ज्यांची सोनिया-राहुलवर निष्ठा आहे तेच आघाडीचा प्रचार करतील, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.


काँग्रेसच्या केंद्रीय समितीची पदाधिकाऱ्यांशी चर्चा
नगर | राधाकृष्ण विखेंवर लवकरच कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. चल्ला वामशी रेड्डी यांनी दिले. भाजप प्रवेशासाठी सुजय विखे यांच्यासाेबत जाणारे सर्व  काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवरही कारवाई हाेणार असल्याचे ते म्हणाले. डॉ. रेड्डी यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. तसेच बैठकीच्या फलकावरून विखेंचा फाेटाेही काढून टाकण्यात आला हाेता.

बातम्या आणखी आहेत...