आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राधे माँ\'वरही येत आहे वेब सीरिज; बोल्‍ड कंटेंटने भरलेला आहे ट्रेलर, पाहून बसेल धक्‍का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्‍वत:ला देवीचा अवतार समजणा-या राधे माँ वर लवकरच वेब सीरिज येत आहे. मात्र नुकत्‍याच रिलिज झालेल्‍या या सिरिजच्‍या ट्रेलरमुळे वाद निर्माण झाला आहे. 'राह दे माँ' असे या सीरिजचे नाव आहे. युट्यूबवर 6 ऑगस्‍ट रोजी सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्‍यात आला. हा ट्रेलर पुर्णपणे बोल्‍ड कंटेंटने भरलेला आहे.

 
या सीरिजमध्‍ये राधे माँ भरकटलेल्‍या युवकांना दिशा दाखवण्‍याचे काम करते, असा दावा निर्मात्‍यांतर्फे करण्‍यात आला आहे. मात्र ट्रेलर रिलीज होताच सोशल मिडियावरून यावर सडकून टीका केली जात आहे.

 

अडल्‍ट कटेंटद्वारे लोकांना आ‍कर्षित करण्‍याचा प्रयत्‍न
ट्रेलरमध्‍ये अडल्‍ट कटेंट असून आपत्‍तीजनक शब्‍दांचा सर्रासपणे वापर करण्‍यात आला आहे. 2 मिनिटांच्‍या ट्रेलरमध्‍ये राधे माँही दिसत असून, यामध्‍ये त्‍या आपल्‍या भक्‍तांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. अडल्‍ट व सेक्‍स कटेंट द्वारे प्रेक्षकांना आ‍कर्षित करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे, अशी टीका सोशल मिडियावर केली जात आहे.


नेमके काय आहे ट्रेलरमध्‍ये?
ट्रेलरच्‍या सुरूवातीलाच 2 तरूणी एकमेकांना किस करताना दिसतात. तसेच पुढे दोन तरूणांमधील जवळीकही दाखवण्‍यात आली आहे. पुर्ण ट्रेलरमध्‍ये अनेकदा कधी तरूणी तर कधी तरूण कपडे काढताना दिसतात.


सोशल मिडियावर ट्रोल झाली राधे माँ
वेब सिरिजच्‍या लॉंचिंगदरम्‍यान निर्मात्‍यांतर्फे सांगण्‍यात आले हाते की, या सिरिजमध्‍ये राधे माँच्‍या आयुष्‍यावर भाष्‍य करण्‍यात आले आहे. मात्र याचे ट्रेलर रिलिज होताच राधे माँ सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. लोक राधे माँची तूलना राम रहिमसोबत करत असून, ही अशीकशी राधे माँ? असा प्रश्‍न विचारत आहे.    

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या धक्‍कादायक ट्रेलरचे स्‍क्रीनशॉट्स... 

 

बातम्या आणखी आहेत...