आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पोस्टपोन झाली नाही सलमान-दिशाच्या 'राधे'ची शूटिंग, अझरबैजानचे शेड्युल करण्यात आले होते रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे चित्रपटसृष्टीवर परिणाम दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे परदेश दौरे रद्द केले तर अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही रद्द करावे लागले, परंतु मुंबई मिरर मधील वृत्तानुसार, सलमान खान आणि दिशा पाटनी स्टारर 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'चे मुंबईतील चित्रीकरण पोस्टपोन करण्यात आलेले नाही. डब्ल्यूएचओने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) जारी केलेल्या सूचनांचे चित्रपटाच्या सेटवर पालन केले जात आहे. चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूचे शूटिंग मुंबईत होत आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग मुंबईत गोव्यात झाले आहे. मुंबई वेळापत्रकात काही पॅचवर्क व्यतिरिक्त सलमान आणि दिशा यांच्यावरही एका गाण्याचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

अझरबैजानमध्ये शूटिंग झाले नाही

यापूर्वी चित्रपटाचे एक शेड्युल अझरबैजानची राजधानी बाकू येथे ठेवण्यात आले होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे येथे शूटिंग होऊ शकली नाही. अलीकडेच, युनिटमधील एका सदस्याच्या म्हणण्यानुसार, "कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहता मोठ्या युनिटसह परदेशात जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तेथे न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." शूटच्या तयारीसाठी काही क्रू मेंबर्स बाकू येथे पोहोचले होते, पण त्यांना परत बोलावण्यात आले होते.

ईदच्या मुहूर्तावर रिलीज होईल चित्रपट

'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट प्रभूदेवा दिग्दर्शन करीत आहेत. सलमान आणि दिशा या चित्रपटाच्या निमित्ताने दुस-यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी दोघांनीही 'भारत' मध्ये स्क्रीन शेअर केली होती. सलमान खान, त्याचा भाऊ सोहेल आणि मेहुणे अतुल अग्निहोत्री हे सलमान खान प्रॉडक्शन, सोहेल खान प्रॉडक्शन आणि रियल लाइफ प्रॉडक्शन या बॅनरखाली एकत्र येऊन हा चित्रपट बनवत आहेत. यंदा ईदच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...