आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Radhika Apte Gets Angry Due To Her Leaked Bold Scene, Said, "we Live In A Society Who Have Narrow Mindset"

स्वतःचा बोल्ड सीन लीक झाल्यामुळे भडकली राधिका आपटे, म्हणाली - 'आपण एका विकृत मनःस्थिती असलेल्या समाजात राहतो'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : राधिका आपटे जगप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या भूमिका इतर अभिनेत्रींनपेक्षा खूप वेगळ्या स्टेट. राधिका स्वतःला त्या कलाकारांच्या लिस्टमध्ये ठेवते ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते, त्यामुळे तिला बोल्ड सीन देण्याबद्दल काही आपत्ती नसते. पण अशातच जे झाले त्यामुळे ती खूप दुखी आहे. राधिका आपटे सध्या आपला हॉलिवूड चित्रपट 'द वेडिंग गेस्ट' मुले चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत 'स्लमडॉग मिलिनियर' फेम देव पटेलदेखील आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एक बोल्ड सीन लीक झाला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल केला गेला होता. 

 

अशातच राधिका आपटेने एका वेबसाइटला इंटरव्यू दिला आणि या मुद्यावर स्पष्टपणे बोलली. राधिका म्हणाली की, चित्रपटात तिचे अनेक उत्तम सीन आहेत. पण याप्रकारचा सीन लीक होणे हे दर्शवते की, आपण एका विकृत मनःस्थिती असलेल्या समाजात राहतो. ती म्हणाली, जो सीन लीक झाला आहे. त्यामध्ये मी आणि देव पटेल दोघेही आहोत पण केवळ माझ्या नावावर तो व्हायरल केला जात आहे. राधिकाने प्रश्न केला की, अखेर का हा सीन देव पटेलच्या नावाने पसरवला जात नाहीये ?

 

'द वेडिंग गेस्ट' बद्दल बोलायचे तर हा चित्रपट 1 मार्चला रिलीज झाला होता. यामध्ये जिम सरभदेखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मायकल विंटरबॉटमने केले आहे. हा चित्रपट अद्याप भारतात रिलीज झालेला नाही.