आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेडियंट मॅक्स हेल्थची खरेदी करणार, तिसरी मोठी हॉस्पिटल चेन होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हॉस्पिटल मॅनेजमेंट फर्म रेडियंट लाइफ केअर मॅक्स हेल्थकेअरची खरेदी करेल. यानंतर दोन्हींचे विलीनीकरण केले जाईल. विलीनीकरणानंतर स्थापन होणाऱ्या कंपनीचे मूल्य ७,२४२ कोटी रुपये असेल. 

 

रेडियंटचे प्रवर्तक अभय सोई या कंपनीचे चेअरमन असतील. मॅक्स हेल्थकेअरचे सध्याचे प्रवर्तक व चेअरमन अनलजित सिंह राजीनामा देतील. मॅक्स हेल्थकेअरच्या खरेदी प्रक्रियेत खासगी इक्विटी फर्म केकेआरही रेडिएंटसोबत आहे.  


रेडियंट व मॅक्स हेल्थकेअरच्या विलीनीकरणातून आकारास येणारी कंपनी उ. भारतातील मोठी हॉस्पिटल नेटवर्क ठरेल. महसुलाच्या दृष्टीने ही देशातील सर्वात मोठी तिसरी मोठी हॉस्पिटल चेन असेल. खाटांच्या संख्येच्या बाबतीत ती चौथ्या क्रमांकाची असेल. त्यांच्या १६ रुग्णालयांत मिळून ३,२०० खाटा आहेत. सध्या अपोलो भारतातील मोठे हॉस्पिटल चेन आहे. देशात त्यांच्या ७० रुग्णालयांत १० हजार खाटा आहेत. फोर्टिस दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

 

चार  टप्प्यांत हा करार पूर्ण होईल 
> रेडियंट लाइफ मॅक्स हेल्थकेअरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लाइफ हेल्थकेअरकडून ४९.७% भागीदारी खरेदी करेल.  
> अनलजित सिंह यांच्या मॅक्स इंडिया हेल्थकेअर व इन्व्हेस्टमेंट बिझनेसच्या स्वतंत्र कंपन्या होतील.  
> यानंतर रेडियंटचे मॅक्स हेल्थकेअरमध्ये विलीनीकरण होईल. यात केकेआरचा ५१.९% भागीदारी होईल. 


उर्वरित व्यवसायाची मॅक्स स्वतंत्र नोंदणी करेल  
या व्यवहारानंतर मॅक्स इंडियाजवळ मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स, फार्मेक्स कॉर्पाेरेशन, अंतरा सीनियर लिव्हिंग मॅक्स यूके व मॅक्स स्किल फर्स्ट व्यवसाय राहतील. त्यांची स्वतंत्र नोंदणी होईल.

 

अशी शेअर होल्डिंग  
7 लाख कोटी रुपयांची भारतातील सध्या आरोग्य निगा बाजारपेठ डेलॉय फर्मनुसार आहे.  
19 लाख कोटी रुपयांची २०२० पर्यंत बाजारपेठ होईल, असा अंदाज आहे.  
26  लाख कोटी रुपयांची २०२२ पर्यंत देशाची हेल्थकेअर बाजारपेठ होईल.

बातम्या आणखी आहेत...