आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन : रेडिओ जॉकीने आत्महत्येस निघालेल्या तरुणास वाचवले; सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनमधील प्रसिद्ध टॉक रेडिओ आरजे (रेडिओ जॉकी) लॅन ली याने आत्महत्या करण्यास निघालेल्या एका तरुणाचा जीव वाचवला. त्याचे झाले असे की, लंडनचा लॅन ली हा एक कार्यक्रम संचालित करत हाेता.

 

त्या वेळी त्याला क्रिस नावाच्या तरुणाचा फोन आला. तो म्हणत होता, मी स्ट्रेस डिसऑर्डरमुळे त्रस्त आहे. मला जगायचे नाही. यासाठी मी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. आता रस्त्यावर तळमळत आहे. ली याने विचारले, तू आता कोणत्या रस्त्यावर आहेस? मी तुला मदत पाठवतो. क्रिस म्हणाला, मी माझे लोकेशन सांगणार नाही. त्यानंतर आरजेने त्याला ३० मिनिटे फोनवर बोलत ठेवले. दरम्यान, पोलिसांच्या मदतीने त्याला वाचवले.

बातम्या आणखी आहेत...