आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या सुरक्षिततेसाठी राफेलची खरेदी गरजेची; हवाई दलप्रमुख बी.एस. धनाेअा यांचा पुनरुच्चार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राफेल विमानांच्या खरेदीत घाेटाळा झाल्याचा अाराेप विराेधकांकडून केला जात असताना हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस. धनाेअा यांनी राफेल विमाने अाणि एस-४०० क्षेपणास्त्रांसारखी सुरक्षा प्रणाली भारताच्या सुरक्षिततेसाठी अावश्यक असल्याचे बुधवारी पुन्हा सांगितले. भारतासमाेर सध्या ‘गंभीर’ धाेक्यांची अाव्हाने अाहेत, या पार्श्वभूमीवर ही विमाने भारताची क्षमता वाढवतील, असेही ते म्हणाले. 


१२६ एेवजी ३६ राफेल खरेदीच्या माेदी सरकारच्या निर्णयाचा बचाव करताना धनाेअा म्हणाले, तूर्त ३६ विमाने मिळाली तरी सध्याच्या संकटांना ताेंड देण्यासाठी हवाई दल सक्षम हाेऊ शकेल. मात्र हवाई दलाला तत्काळ लढाऊ विमानांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यूपीए सरकारने फ्रान्सची कंपनी डसाल्ट एव्हिएशनसाेबत १२६ राफेल खरेदीचा केलेला करार माेदी सरकारने रद्द केला. तसेच थेट फ्रान्स सरकारशी ३६ राफेल विमानांचा साैदा केला. त्यावर काँग्रेसकडून टीका हाेत अाहे. 


तेजस पुरेसे नाही
धनाेअा म्हणाले, देशात निर्माण हाेणारे तेजस विमान हवाई दलासमाेरील संकटांचा पूर्ण क्षमतेने मुकाबला करण्यास सक्षम नाहीत. त्यासाठी रफालसारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज अाहे.

बातम्या आणखी आहेत...