आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राफेल भारतातील सर्वात मोठा संरक्षण घोटाळा': काँग्रेसचे प्रवक्ते आमदार राहुल बोंद्रे यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- राफेल घोटाळा हा भाजप सरकारचा सर्वात मोठा संरक्षण घोटाळा आहे. या प्रकरणावर १४ डिसेंबर २०१८ चे न्यायालयाचे आदेशातही हा उचित फोरम नाही, आणि सर्वोच्च न्यायालय किंमत, वैशिष्टे आणि तांत्रिक उपयोगिता या मागण्यांवर निर्णय घेवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, त्यांचे न्याय क्षेत्र सिमीत आहे. यामुळेच हे काम फक्त संयुक्त सांसदीय समिती करू शकते, तिची मागणी काँग्रेस करीत आली आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे स्वतः क्लिनचिट दिली ती तर्कहीन आणि निराधार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, जि.प सदस्या जयश्रीताई शेळके, जिल्हा उपाध्यक्ष समाधान सुपेकर, जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ उपस्थित होते. या प्रकरणी न्यायालयाला चुकीची माहिती पुरवून या भ्रष्टाचारातून क्लिनचिट मिळाल्याचा आभास निर्माण करीत जनतेची दिशाभूल भाजपकडून करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

 

विदर्भातील पाच जिल्ह्यात आ. बोंद्रे करणार पंचनामा 
देशातील सर्वात मोठा सुरक्षा घोटाळा आणि त्यात झालेला भ्रष्टाचाराचा व्यवहार, देशाच्या सुरक्षेला नुकसान पोहोचवत सरकारी कंपनीकडे डोळेझाक करीत, भांडवलदार मित्रांना फायदा पोहोचवण्याचा घाणेरडा प्रकार होतो. 

बातम्या आणखी आहेत...