नदाल, सानिया मिर्झाची शानदार विजयी आघाडी

May 31,2011 01:47:30 PM IST

nadal_258_01पॅरिस - पाच वेळा चॅम्पियपन्सशिपचा बहुमान पटकावलेल्या राफेल नदालने एकेरीत 7-5, 6-3, 6-4 गुणांनी क्रोएशियाच्या इव्हानवर विजय संपादन करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

बोपन्ना-कुरेशी उपांत्यपूर्व फेरीत
‘इंडो-पाक एक्स्प्रेस’म्हणून प्रसिध्द असलेल्या रोहन बोपन्ना -एसैम कुरेशी या जोडीने पुरुष दुहेरीत 6-3, 7-5 गुणांच्या आघाडीने अँन्डु-डेनिसला पराभवाची धूळ चारून फ्रेंच ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.भारतीय टेनिसपटू बोपन्ना व त्याचा साथीदार पाक टेनिसपटू कुरेशी या जोडीची लढत कझाकिस्तानच्या अँन्ड्रु व उझकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनसोबत झाली. पुरुष दुहेरीतील आव्हान राखुन ठेवण्यासाठी इंडो-पाक एक्स्प्रेसने दमदार सुरुवात केली.

सानियाचा दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश
पॅरिस - भारतीय टेनिसपटू सानिया व एलेना ह्या जोडीने महिला दुहेरीत 6-0, 7-5 गुणांनी फ्लेविया पेनेट्टा-गिसेला डुल्कोवर शानदार विजय संपादन करून फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली.तसेच पुरूष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीनेही शानदार विजय मिळवून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश मिळवला. दुहेरीत भारताच्या आघाडीच्या सानिया व बोपन्ना या जोडीने सोमवारचा दिवस चांगलाच गाजवला.विजयी आघाडीचा सुर गवसलेल्या सानियाने एलेनासोबत आक्रमक खेळी करून उपांत्य फेरी गाठली.X