आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदपत्रांची फोटो कॉपी म्हणजे चोरीच; राफेलप्रकरणी केंद्राचे कोर्टात शपथपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राफेल या लढाऊ विमानाच्या करारासंबंधी केंद्र सरकारने बुधवारी सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केले. या प्रकरणात देशाच्या सार्वभौमत्वाशीच तडजोड झाली आहे, असे केंद्राने आठ पानी शपथपत्रात म्हटले आहे. सरकारच्या परवानगीविना कागदपत्रांची फोटो कॉपी काढून मंत्रालयाबाहेर नेण्यात आली. त्यामुळे यासंबंधी दाखल फेरविचार याचिकांतून ही कागदपत्रे काढून टाकली जावीत, असे केंद्राने नमूद केले. तत्पूर्वी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नवे शपथपत्र दाखल करण्याची परवानगी कोर्टाकडे मागितली. 


यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी परवानगी दिली आणि संरक्षण सचिव संजय मिश्रा यांनी शपथपत्र दाखल केले. राफेलवर दोन्ही देशांत गोपनीयता बाळगली जावी म्हणून करार झाला होता. सरकारने ती गोपनीयता ठेवली. मात्र, याचिकाकर्त्यांनी ही माहिती फोडली. ही माहिती बाहेर कशी आली याची चौकशी सुरू असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.


शपथपत्रातील प्रमुख मुद्दे
- प्रशांत भूषण यांनी फेरविचार याचिकेत पान क्र. ७४ ते ७७ पर्यंत चार पानी नोंदी, पान क्र. २८-२९ वर दोन पानी नोंदी आणि पान क्र. ३७-४४ वर ८ पानी नोंदी समाविष्ट केल्या आहेत. या सर्व कागदपत्रांवर संरक्षण मंत्रालयाचा गोपनीयतेचा शेरा आहे.
- ही कागदपत्रे संवेदनशील असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. या १४ पानांतील संवेदनशील नोंदी सरकारच्या परवानगीविना चोरून संरक्षण मंत्रालयाबाहेर नेण्यात आल्या.
- यामुळे भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध अडचणीत आले.

बातम्या आणखी आहेत...