आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raghav Lawrence Returned To 'Lakshmi Bomb', Said 'Thank You' To Kashay Kumar For Resolving Differences

'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये पुन्हा परतला राघव लॉरेन्स, मतभेद सोडवण्यासाठी अक्षयला म्हणाला - 'धन्यवाद' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांची पुन्हा एकदा हाॅरर कॉमेडी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब' मध्ये एंट्री झाली आहे. याची माहिती स्वत: राघवने रविवारी एक ट्विट करून दिली. 'लक्ष्मी बॉम्ब' दक्षिणेचा एक ब्लॉकबास्टर चित्रपट 'कंचना' चा हिंदी रिमेक आहे. यात अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. 

 

अक्षय कुमारमुळे परतला राघव... 
दिग्दर्शकाने ट्विटरवर अक्षयसोबत एक फोटो शेअर करत लिहिले..., तुम्हा लोकांची जी इच्छा होती तसेच झाले. मी पुन्हा एकदा 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सहभागी झालो आहे. अक्षय आणि शबीना खान चित्रपटाची निर्माती यांनी माझ्या भावना समजून घेतल्या आणि सर्व मुद्दे सोडवले त्यासाठी त्यांचे आभार. या दोघांनी मला सन्मान दिला त्यासाठी आभार व्यक्त करतो. चित्रपटाचा पुन्हा भाग बनून आनंदी आहे. 

 

स्वाभिमानासाठी सोडला होता चित्रपट... 
खरे तर राघवला न सांगताच चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते, त्यामुळे त्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. राघवने ट्विट केले होते की, 'माझा आत्मसम्मान पैसे आणि प्रसिद्धीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे मी चित्रपटाच्या बाहेर पडलो.' 

 

 

पुढच्यावर्षी जूनमध्ये रिलीज होणार आहे चित्रपट... 
'लक्ष्मी बॉम्ब' तामिळ चित्रपट 'कंचना' चा हिंदी रिमेक आहे. 'कंचना'चे डायरेक्शन राघवनेच केले होते. त्यासोबतच त्याने या चित्रपटात अभिनय देखील केला होता. 'लक्ष्मी बॉम्ब' 5 जून 2020 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच किआरा अडवानी, अमिताभ बच्चन, तुषार कपूर आणि आर माधवन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.