आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९७१ मधील हीरो अरुण खेत्रपालच्या कथेसाठी लष्कराची मदत घेणार राघवन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'अंधाधुन' फेम दिग्दर्शक श्रीराम राघवन शहीद सैनिक अरुण खेत्रपाल यांच्यावर चित्रपट बनवणार आहेत. यासाठी ते भारतीय लष्कराची मदत घेणार आहेत. याविषयी श्रीराम सांगतात, हा चित्रपट माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे. कारण ही माझी कथा नाही. ही कथा मला दिनेश विजान यांनी ऐकवली होती. तेव्हा ती मला आवडली होती त्यानंतर मी यावर चित्रपट करण्याचा विचार केला. आता लेखनाचे काम संपले असून आम्ही आता कलाकारांच्या निवडीवर बैठक घेणार आहाेत. आम्ही यासाठी अजून कोणत्याच अभिनेत्याला बोललो नाही. 
 

या आव्हानात्मक गोष्टीवर मदत करणार लष्कर... 
- हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे जो १९७१च्या काळावर आधारित आहे. निर्मात्यांना त्या काळातील सेटसाठी मदत करणार लष्कर. 
- अरुण खेत्रपाल यांचे पात्र समजण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेतली जाईल. 
 

वरुण धवनच्या नावावर सुरू आहे चर्चा...  
या चित्रपटासाठी सध्या श्रीराम वरुण धवनसोबत चर्चा करत आहेत. वरुणला ही भूमिका पसंत आली आहे. तो यासाठी तारखा जुळवण्यात लागला आहे. वरुण चेहरा कमी वयाच्या मुलासारखा आहे आणि तो २१ वर्षाच्या तरुणाच्या भूमिकेत एकदम फीट बसू शकतो, असे निर्मात्यांना वाटत आहे. वरुणने अजून हा चित्रपट साइन केला नाही मात्र तो नक्कीच हा चित्रपट साइन करू शकतो अशी चर्चा आहे. श्रीराम आणि वरुण यांनी 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बदलापूर' मध्ये सोबत काम केले होते 
 
श्रीराम राघवन म्हणाले, 'भारतीय लष्करावर चित्रपट बनवणे फार जबाबदारीचे काम असते. ज्या व्यक्तीने देशासाठी बलिदान दिले, त्यांच्यावर चित्रपट बनवायचा असतो. आम्ही यात काहीच चुकीची माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही लष्कराच्या मदतीने प्रेक्षकांपर्यंत योग्य माहिती देणार आहोत. 
 

कोण होते अरुण...  
भारत- पाकमध्ये १९७१ मध्ये झालेल्या युद्धात अरुण खेत्रपाल फक्त २१ वर्षाच्या वयात देशासाठी शहीद झाले होते. त्यांनी जीवाची पर्वा न करत पाकिस्तानी घुसखोऱ्यांना ठार केले होते. त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...