आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raghu Ram And Natalie Become Parents, Hospital Shared A News That They Have A Baby Boy

रघु राम आणि नताली झाले आई-बाबा, हॉस्पिटलने इंस्टाग्रामवर शेअर केले, 'मुलगा झाले आहे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : रियलटी शो रोडीज फेम रघु राम आणि कॅनेडियन सिंगर नताली डी लूसियो आई बाबा झाले आहेत. नतालीने मुलाला जन्म दिला आहे. मात्र या गोष्टीची माहिती या दोघांनी नाही तर हॉस्पिटलने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, 'रघु रामच्या मुलाचा जन्म 6 जानेवारीला झाला आहे.' 

यापूर्वी नताशा आणि रघु रामने प्रेग्नन्सी फोटाे शूटचे फोटो शेअर केले होते. रघुने 4 दिवसांपूर्वीच एक व्हिडिओदेखील शेअर केला होता, ज्यामध्ये त्याचे बहीण आणि भाऊजी बाळाला लवकरात लवकर येण्याची रिक्वेस्ट करताना दिसत आहे.  

2018 मध्ये केले होते लग्न... 

मुलाच्या जन्मानंतर रघुने सांगितले की तो आणि नताली आधीच नव्या घरात शिफ्ट झाले आहेत. जेथे नतालीने बाळासाठी नर्सरी डेकोरेट करून ठेवली आहे.  ज्याच्या भिंतीवर माझ्या मित्रांनी संदेश लिहिले होते. तसेच काही लहान प्राणी, आकाश आणि स्टार्सदेखील रूममध्ये आहेत. नताली आणि रघु रामने डिसेंबर 2018 मध्ये बीच वेडिंग केली होती. 

बातम्या आणखी आहेत...