Home | Sports | From The Field | Rahi became the first shooter to win a gold in a double shootoff

कोल्हापूरच्या राहीचा ‘सुवर्ण’वेध, डबल शूटऑफमध्ये सुवर्णविजेती भारताची पहिली नेमबाज

वृत्तसंस्था | Update - Aug 23, 2018, 05:48 AM IST

राही सरनौबतने आशियाई स्पर्धेत बुधवारी पहिले सुवर्णपदक जिंकले. तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला.

 • Rahi became the first shooter to win a gold in a double shootoff

  जकार्ता - आशियाई क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबतने बुधवारी इतिहास रचला. २७ वर्षांच्या राहीने २५ मी. पिस्टल डबल शूटऑफमध्ये थायलंडच्या नफास्वान यंगपईबूनला हरवत सुवर्णपदक जिंकले. ती डबल शूटऑफमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज बनली. फायनलमध्ये दोघी स्कोअर ३४-३४ने बरोबरीत होत्या. पहिल्या शूटऑफमध्ये दोघींनी ४-४ गुण मिळवले. पुन्हा दुसऱ्या शूटअॉफमध्ये राहीने ३-२ ने विजय मिळवला.

  राहीला २०१५ च्या अखेरीस दुखापत झाली होती. तरीही तिने रिअोच्या पात्रता फेरीत सहभाग घेतल्याने दुखापत बळावून ऑलिम्पिकची संधी हुकली. नेमबाजीपासून वर्षभर लांब राहावे लागल्याने ती निराश हाेती. यानंतर तिने नव्या उमेदीने सराव करत यशश्री मिळवली.

  राहीने यापूर्वी २०१० आणि २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील सुवर्ण जिंकले आहे. पहिल्या शूटऑफमध्ये दोन्ही खेळाडूंनी पाचपैकी ४ शॉटने लक्ष्य भेदले. त्यानंतर दुसऱ्या शॉटमध्ये राहीने तीन अचूक वेध घेतले आणि यंगपाईबूनचे तीन शॉट चुकले. दक्षिण कोरियाची मिनजुंग किमने २९ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

  राहीला राज्य सरकारकडून ५० लाखांचे बक्षीस जाहीर

  स्पर्धेत पदकविजेत्या महाराष्ट्रातील खेळाडूंना रोख बक्षिसांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सुवर्णविजेत्या राही सरनोबतला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.


  पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर
  राहीने पात्रता फेरीत ५८० गुणांसह सातव्या स्थानावर राहत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तिने प्रिसिशनमध्ये २८८ आणि रॅपिडमध्ये २९२ गुणांची कमाई केली. दुसरीकडे १६ वर्षीय मनू भाकरने पात्रता फेरीत ५९३ गुणांसह विक्रमासह फायनलमध्ये स्थान मिळवले होते. तिने प्रिसिशनमध्ये २९७ आणि रॅपिडमध्ये २९६ गुण मिळवले होते. मात्र, फायनलमध्ये मनूला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताचे नेमबाजीतील दुसरे व एकूण चौथे सुवर्णपदक ठरले.

  राही दुखापतीमुळे एक वर्ष होती नेमबाजीच्या सरावापासून दूर

  राहीला २०१५ मध्ये हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. त्यानंतर तिने रिओ ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत सहभाग घेतला. ती तिची चुकी ठरली. त्यानंतर तिची दुखापत वाढली. ती रिओसाठी पात्रता मिळवू शकली नाही. यादरम्यान तिला नैराश्यदेखील आले. पुनर्वसनादरम्यान ती नव्याने सुरुवात करू शकते, असे तिला जाणवले. राही म्हटले होते की, ‘मी आपले नवीन सरावाचे नियोजन बनवले. विचार बदलण्याची वेळ आली होती. विजयाचे ध्येय असलेल्या प्रशिक्षकाचा शोध घेत हाेते. मला ऑलिम्पिक पदक विजेता प्रशिक्षक हवा होता. कारण चॅम्पियनची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.’ राहीने १० महिन्यांपूर्वी नेमबाज मुंखबायर डोर्जसुरेन यांना प्रशिक्षक बनवले.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, हॉकी : भारताचा सर्वात मोठा विजय, ८६ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत...

 • Rahi became the first shooter to win a gold in a double shootoff

  हॉकी : भारताचा सर्वात मोठा विजय, हाँगकाँगला २६-० ने हरवले, ८६ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत

  भारताने हाँगकाँगला हॉकीत तब्बल २६-० ने हरवले. हा ८६ वर्षांतील नवा विक्रम आहे. १९३२ ऑलिम्पिकमध्ये भारताने अमेरिकेला २४-१ ने हरवले होते. शेवटच्या ७ मिनिटांत गोलकीपर श्रीजेशला विश्राम देण्यात आला होता. तरीही हाँगकाँग गोल करू शकला नाही. त्यांना शेवटी पेनल्टी कॉर्नर मिळाला तेव्हा भारताकडे गोलकीपरही नव्हता. रूपिंदर पाल पॅडविनाच गोलपोस्टमध्ये उभा राहिला व पेनल्टी कॉर्नर वाचवला. भारताने पहिल्या सामन्यात १७-०ने इंडोनेशियाला धूळ चारली होती. भारताने अातापर्यंत २ सामन्यांत ४३ गोल केले आहेत. विरोधी संघांना एकही गोल करता आलेला नाही.

   

 • Rahi became the first shooter to win a gold in a double shootoff
  राही सरनोबत

Trending