Home | Sports | Other Sports | rahi sarnobat qualify for olympic

ऑलिम्पिक पदकासाठी नवा हुरूप मिळाला!

Agency | Update - May 30, 2011, 05:59 PM IST

भारताला नेमबाजीत लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याचे स्वप्न महाराष्ट्रातही पडले आहे. हे स्वप्न दाखविले आहे महाराष्ट्राची नेमबाज राही सरनौबत हिने.

 • rahi sarnobat qualify for olympic

  मुंबई - भारताला नेमबाजीत लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याचे स्वप्न महाराष्ट्रातही पडले आहे. हे स्वप्न दाखविले आहे महाराष्ट्राची नेमबाज राही सरनौबत हिने.

  अमेरिकेत अलीकडेच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 25 मीटर्स एअर पिस्तूल स्पर्धेत राहीने 789.7 गुण नोंदवून कांस्यपदक पटकाविले होते. राहीच्या या पराक्रमामुळे तिच्यासाठी लंडन ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत. 789.2 एवढे गुण गत ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या खेळाडूचे आहेत.

  राहीच्या आणि भारताच्या या स्वप्नपूर्तीचा मार्ग पुण्याच्या बालेवाडीतून जातो. राही सध्या पुण्याच्या बालेवाडी येथील शूटिंग रेंजमध्ये कझाकस्थानचे प्रशिक्षक अनातोली यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.

  प्रशिक्षण कार्यक्रमातून वेळ काढून राहीने ‘दिव्य मराठी’कडे आपली प्रतिक्रिया दिली. राही म्हणत होती, अमेरिकेतील स्पर्धेमुळे मला नवा आत्मविश्वास मिळाला. त्या स्पर्धेत ऐन स्पर्धेच्या आधी मी ‘ग्रीप’ बदलली. त्या ‘ग्रीप’ची मला सवय नव्हती. फक्त काही तास आधी सराव केला तेवढाच. तरीही काही गुणच कमी झाले. गुणांमध्ये त्यामुळे फरक पडला, पण अधिक सरावानंतर त्यामुळे मला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास वाटतो.

  अमेरिकेतील विश्वचषक स्पर्धेत मी अंतिम फेरीत 8 व्या स्थानावर होते. तेथून मी पदक पटकाविताना तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. अंतिम फेरीचा गतवर्षीचा विक्रम होता 207.0 गुणांचा. तो विक्रम मोडून मी 207.7 गुण नोंदविले. वर्ल्डकप स्पर्धेत मला अन्य आघाडीच्या शूटर्सना जवळून पाहता आले, त्यांच्याशी स्पर्धा करता आली, त्यामुळे मला खरेच काही शिकता आले.Trending