आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारकडून राष्ट्रवादाचे राजकारण, प्रियंकांचा घणाघात, मोदींच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसच्या प्रचार मोहिमेला सुरुवात    

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर   - लोकसभा निवडणुका जाहीर होताच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधून प्रचार मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने बापूंच्या या प्रांतातून देशातील द्वेषाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करत देशाच्या मूळ स्वभावावर  भाष्य केले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांनी आपल्या भाषणांतून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महासचिव झाल्यानंतर प्रियंका यांनी आपल्या पहिल्याच भाषणातून आपण निव्वळ उत्तर प्रदेशापुरते मर्यादित नसल्याचे संकेत दिला. 


या भाषणात त्यांनी देशभक्तीचा अर्थही सांगितला. त्या म्हणाल्या, जागरूकता ही सर्वात मोठी देशभक्ती आहे. देशात द्वेष वाढतो आहे, मात्र सत्य शोधणे हा या देशाचा स्वभाव आहे. अपयश लपवण्यासाठी मोदी सरकार देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर राजकारण करत आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या मोदी स्वत:ला मागास वर्गाचे म्हणून घेत सहानुभूती मिळवत आहेत, मात्र लोक त्यांच्या चुकीच्या धोरणाने  त्रस्त आहेत.  या सभेत पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  


३ मुद्दे : काँग्रेससाठी आव्हान होते, तेच शस्त्र केले
१. घराणेशाही :
सर्वांना वाटले प्रियंका गांधी व्यासपीठावर बसतील, त्या चौथ्या रांगेत बसल्या   
दाखवले : प्रियंका पक्षात खास नाहीत. 
का? : या बैठकीत त्या बोलणार नव्हत्या.   
सभेत सांगितले : दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन २०१४ मध्ये मोदी सरकारने दिले होते. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार होते, ते कोठे गेले. तुम्ही योग्य प्रश्न विचारा. योग्य मुद्दे उपस्थित करा.


२.गांधी-पटेल :  साबरमती आश्रमात बैठक
दाखवले- गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडीयात्रा सुरू करून स्वातंत्र्याच्या लढाईला प्रारंभ केला होता. काँग्रेसने येथे बैठक घेऊन पक्ष ध्रुवीकरणाविरुद्ध व संस्थांच्या स्वातंत्र्याची लढाई लढत असल्याचे दाखवले आहे. 
सांगितले - साबरमती आश्रमातील झाडाखाली बसून माझ्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. हा देश परस्पर सद्भावनेतून स्थापन झाला आहे. देशातील संस्था नष्ट केल्या जात आहेत.  


३. राष्ट्रवाद : जागरूकता हीच देशभक्ती आहे हा नवा मंत्र दिला  
दाखवले - संकल्प सभेचे नाव जय जवान जय किसान ठेवले होते. यात भाषण करताना प्रियंका यांनी मनगटावर तिरंगी रंगाचा बँड घातला होता.  
का ?- सभेपूर्वी त्यांनी शहीद स्मारकाला भेट दिली होती.  
सांगितले :“हा जवानांचा देश आहे. तुमचे मत एक शस्त्र आहे. असे शस्त्र जे तुम्हाला बळकटी देईल. निवडणुकीत तुमच्यासमोर अनेक मुद्दे उचलले जातील, मात्र तुम्ही जागरूक असणे ही देशाची भक्ती आहे.’


आम्ही मसूद अझहरला पकडले, भाजपने सोडले :  राहुल  
राहुल गांधी म्हणाले की, पुलवामा हल्ल्याला जबाबदार अतिरेकी मसूद अझहरला काँग्रेस सरकारने पकडले होते, मात्र भाजप सरकारनेच त्याला पाकिस्तानात पाठवले. 

बातम्या आणखी आहेत...