आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्यांदा जागतिक कुस्ती स्पर्धेचे तिकीट मिळवणारा राहुल आवारे ठरला महाराष्ट्रातील पहिला मल्ल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक | आैरंगाबाद
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत तिसऱ्यांदा पात्रता मिळवत आपल्या शिरपेचात मानाचा नवीन तुरा खोवला आहे. मूळ पाटोदा (जि. बीड) येथील राहुल सप्टेंबरमध्ये कझाकिस्तानमध्ये होत असलेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. 

यापूर्वी,२०११ आणि २०१४ मध्येही जागतिक स्पर्धेत त्याने सहभाग नाेंदवला हाेता. आता कझाकिस्तानमध्ये  १४ ते २२ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होत आहे. आहे. दिल्ली येथे निवड चाचणीत सर्वाेत्तम कामगिरी करत राहुलने भारतीय संघात स्थान मिळवले. निवड चाचणीत फायनलमध्ये राहुलने रवींदरचा ६-२ ने पराभव केला. त्याने सलग तीन विजयासह अंतिम फेरी गाठली हाेती.
टाॅप-५ मुळे पदकाचा दावा प्रबळ : राहुलने यंदाच्या सत्रात तीन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दाेन कांस्यसह एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे जागतिक क्रमवारीत त्याची प्रगती झाली. पुरुषांच्या ६१ किलाे वजन गटात टाॅप-५ मध्ये त्याने चौथे स्थान मिळवले. त्यामुळे त्याचा आगामी स्पर्धेतील दावा पक्का मानला जातो. 

आॅलिम्पिकवारीची होणार स्वप्नपूर्ती : कझाकिस्तानातील स्पर्धेतून देशभरातील मल्लांना आगामी २०२० टाेकियाे आॅलिम्पिक स्पर्धेतील सहभाग निश्चित करण्याची संधी आहे. या स्पर्धेतील पदक विजेत्या टाॅप-३ मल्लांना आॅलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे. त्यामुळे राहुल हा किताबाचा दावेदार मानला जाताे.

महाराष्ट्राचा चाैथा मल्ल 
जागतिक कुस्ती स्पर्धेत पात्र ठरलेला राहुल महाराष्ट्राचा चाैथा मल्ल आहे. यापूर्वी पुण्याचे काका पवार, गाेविंद पवार, गगन यांनीही ही स्पर्धा गाजवली आहे.  काका पवार यांनी दाेन वेळा, तर गाेविंद व गगनने एक वेळा जागतिक स्पर्धेत सहभाग नाेंदवला. 

कसून सरावातून लक्ष्य साधणार
निवड चाचणीमधील सलग विजयाने माझा आत्मविश्वास वाढला आहे. आता जागतिक कुस्ती स्पर्धेत मला पदक जिंकायचे आहे. त्यासाठी मी तीन आठवडे कझाकिस्तान येथे कसून सराव करून लक्ष्य साधणार आहे. - राहुल आवारे, राष्ट्रकुल चॅम्पियन