आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल बोसकडून दोन केळींसाठी हॉटेलने वसूल केले होते 442 रुपये, आता लागला आहे 25000 रुपयांचा दंड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेता राहुल बोसने ट्विटरवर सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी जेव्हा तो चंडीगडच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबला होता तेव्हा हॉटेलमध्ये दोन केळी मागवल्यावर त्याला 442.50 रुपयांचे बिल थोपवले गेले होते. राहुलच्या या खुलास्यानंतर चंडीगडचे डेप्युटी कमिश्नर आणि टॅक्स कमिश्नर मनदीप सिंह बरार यांनी यावर कारवाई करत उच्च स्तरीय तपासणीचे आदेश दिले होते. तपासानंतर हॉटेल दोषी आढळून आल्याने कारवाई केली गेली.  

 

हॉटेलला लागला दंड... 
राहुल चंडीगडच्या हॉटेल जेडब्ल्यू मरीयेटमध्ये थांबला होता. ज्यावर आता दोन केळीसाठी 442.50 रुपये चार्ज करण्यासाठी 25, 000 रुपयांचा दंड लागला आहे. एक्साइज आणि टॅक्स डिपार्टमेंटच्या टीमने विक्रीचे सर्व डॉक्यूमेंट जब्त केले आहेत आणि याचादेखील तपास केला जात आहे की, हॉटेल वसूल करत असलेले टॅक्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जमा करत आहे की नाही. याव्यतिरिक्त असिस्टंट एक्साइज आणि टॅक्स कमिश्नर राजीव चौधरीने सांगितले की, ताजी फळे टॅक्स फ्री आयटम्समध्ये येतात. त्यामुळे हॉटेल अथॉरिटीकडे उत्तर मागितले जात आहे की, त्यांनी एवढ्या जास्त किंमतीवर फळे का लावली ?

 

राहुलने शेअर केला होता व्हिडीओ... 
राहुलने 22 जुलैला एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने सांगितले की, 'तो हॉटेलमध्ये जिमहुन जेव्हा आपल्या रूममध्ये परतला तेव्हा त्याने स्टाफ केळी आणण्याचे सांगितले. स्टाफने प्लेटमध्ये सजवून दोन केळी आणली आणि सोबतच या 'फूड प्लेटर' चे बिल दिले ज्यामध्ये जीएसटीसह दोन केळींची किंमत 442.50 रु. लिहिली होती. राहुल हे बिल पाहून हैराण झाला.'