आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Bose Ordered 2 Bananas And Five Star Hotel Handed Over Him A Bill Of Rs 442

राहुल बोसने ऑर्डर केली 2 केळी, तर फाईव्ह स्टार हॉटेलने सोपवले 442 रुपयांचे बिल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेता राहुल बोस सध्या चंडीगडमध्ये शूटिंग करत आहे. तो तेथे एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या सुटमधे थांबला आहे. त्याने ट्विटरवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो संगत आहे की, हॉटेलमध्ये केवळ दोन केळी मागवल्यावर त्याला 442.50 रुपयांचे बिल सोपवले गेले. 

 

राहुलने व्हिडिओमध्ये सांगितली संपूर्ण गोष्ट... 
राहुलनुसार, तो हॉटेलमध्ये जिमहुन जेव्हा आपल्या रूममध्ये परतला तेव्हा त्याने स्टाफ केळी आणण्याचे सांगितले. स्टाफने प्लेटमध्ये सजवून दोन केळी आणली आणि सोबतच या 'फूड प्लेटर' चे बिल दिले ज्यामध्ये जीएसटीसह दोन केळींची किंमत 442.50 रु. लिहिली होती. राहुल हे बिल पाहून हैराण झाला आणि त्याने व्हिडिओमध्ये सांगितले, 'हे माझ्यासाठी जरा जास्तच चांगले ठरले आहे.' 

 

 

 

सोशल मीडिया यूजर्सने शेअर केले अनेक जोक्स... 
एक यूजर या पूर्ण प्रकारावर हैरानी दर्शवत म्हणाला, 'हे केवळ बनाना नाहीये तर याला उल्लू बनवणे म्हणतात.' दुसरा यूजर म्हणाला, 'ती गोल्ड प्लेटेड केळी असतील.' आणखी एका यूजरने लिहिले, 'जर तुम्ही एवढ्या महागड्या सुटमधे थांबू शकतात तर मग हे महागडी केळी घ्यायला काय हरकत आहे ?' आणखी एका यूजरने लिहिले, 'जसे मल्टीप्लेक्समध्ये पॉपकॉर्न खरेदी केल्यावर फीलिंग येते तशीच फीलिंग आहे.' 

 

बातम्या आणखी आहेत...