‘चौकीदार चोर’ : राहुल गांधी यांच्या खेदावर कोर्ट असमाधानी, पुन्हा नोटीस

दिव्य मराठी

Apr 24,2019 08:41:00 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून (सुप्रीम कोर्ट म्हणाले, चौकीदार चोर आहे.) त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्त केले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राहुल यांना पुन्हा अवमानना नोटीस जारी केली आहे. यासोबत अवमानना प्रकरण न चालवण्याची विनंतीही फेटाळली. अवमानना प्रकरणाची सुनावणीही राफेल प्रकरणात दाखल फेरविचार याचिकेसोबत ३० एप्रिलला होणार आहे.

कोर्ट म्हणाले- चौकीदार कोण आहे
सरन्यायाधीशांनी लेखी यांना विचारले चौकीदार कोण आहे, यासोबत कोर्टाने सिंघवींना विचारले, आम्ही तुमच्या आधीच्या उत्तरावर समाधानी नाही.

लेखींचा युक्तिवाद - ही माफी नाही
याचिकाकर्त्या भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांचे वकील म्हणाले की, राहुल यांनी ज्या पद्धतीने खेद व्यक्त केला आहे, त्यास माफी म्हटले जाऊ शकत नाही. दुसरीकडे, राहुल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, राहुल यांनी प्रामाणिकपणे खेद व्यक्त केला आहे.

X