Home | National | Other State | Rahul Dravid's old video trends, as a behavioural lesson for controversy hit Hardik Pandya

बंद खोलीत 20 वर्षीय मुलगी राहूल द्रविडला म्हणाली होती असे काही, की तिच्यावर काढला राग, व्हायरल झाला व्हिडीओ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 03:19 PM IST

व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, हार्डिक पांड्याने काहीतरी शिकायला पाहिजे.

  • नॅशनल डेस्क- टीम इंडियाचा 'दीवार' नावाने ओळखला जाणारा राहुल द्रविड 46 वर्षांचा झाला आहे. त्याला टीम इंडियाचा रिअल जेंटलमॅन समजले जाते. त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे आणि सध्या अंडर-19 टीम इंडियाचा हेड कोच आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जुना एक व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे. 'MTV बकरा' नावाच्या लोकप्रिय शोने राहुल सोबत मोठी मस्करी केली होती. राहुलला कॅमेरासमोर एका मुलीने प्रपोज केले होते, त्यानंतर राहुल घाबरला आणि मुलीला रागवले. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय शो कॉफी विद करणमध्ये हार्दिक पंड्याने महिलांविषयी अपमानास्पद टिप्पणी केली होती. यासाठी देखील व्हिडिओला शेअर केले जात आहे आणि राहुलप्रमाणे जेंटलमॅन बनण्याचा सल्ला त्याला दिला जात आहे.


    असे झाले होते
    राहुल द्रविड इंटरव्ह्य़ूसाठी पोहचला होता, त्यानंतर महिला अँकरने सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि राहुलसोबत गप्पा मारणे सुरू केले. राहुल त्यावेळेस जेवण करत होता, अचानक मुलीने त्याला प्रपोज केले आणि हे ऐकुण राहुल आश्चर्यचकीत झाला. त्यानंतर तो तिला रागावू लागला आणि शिक्षणाकडे लक्ष दे असे सांगून बाहेर निघाला. त्यानतरं राहुलाला कळाले की, हा एक बकरा शो आहे आणि त्याच्यासोबत मस्करी होत आहे, तो खुप हसला.


    राहुल द्रविडचा रिकॉर्ड
    द्रविडने आपल्या 16 वर्षांच्या इंटरनॅशनल करियरमध्ये 164 टेस्‍ट, 344 वनडे आणि एक टी20 मॅच खेळला आहे. टेस्‍ट क्रिकेटमध्ये त्याने 36 शतकांच्या मदतीने 13288, वनडेणध्ये 12 शतकांच्या मदतीने 10889 आणि एका टी-20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 31 रन बनवले आहेत.

Trending