आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेलच्या आसपासही कोणी फिरकले तर चौकीदार त्याला हटवणार, CBI अधिकाऱ्याच्या कारवाईवर राहुल गांधींचा हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या प्रकरणाने आता राजकारण पेटले आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, राफेल घोटाळा समोर येऊ नये म्हणून त्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. राहुल गांधी यांनी याबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 


राजस्थानात निवडणूक प्रचाराच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी सीबीआयचे प्रकरण आणि रफाल डीलचा संबंध जोडत सरकारवर आरोप केले आहेत. राहुल गांधी यावेळी म्हणाले, काल रात्री चौकीदाराने सीबीआयच्या डायरेक्टरला पदावरून हटवले. कारण सीबीआयच्या या डायरेक्टरने रफालबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केले होते. यासंदर्भात राहुल गांधींनी एक ट्वीटदेखील केले. त्यात त्यांनी लिहिले, सीबीआय चीफ आलोक वर्मा हे रफाल घोटाळ्याची कागदपत्रे गोळा करत होते. त्यांना बळजबरी सुटीवर पाठवण्यात आले आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट संदेश दिला आहे. तो म्हणजे, जे कोणी रफालच्या आसपासही येईल, त्याला हटवले जाईल. 

 

राहुल गांधींचे ट्वीट..

CBI चीफ आलोक वर्मा राफेल घोटाले के कागजात इकट्ठा कर रहे थे। उन्हें जबरदस्ती छुट्टी पर भेज दिया गया।

प्रधानमंत्री का मैसेज एकदम साफ है जो भी राफेल के इर्द गिर्द आएगा- हटा दिया जाएगा, मिटा दिया जाएगा।

देश और संविधान खतरे में हैं।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 24, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...