आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफाल : राहुल गांधी म्हणाले-पंतप्रधान भ्रष्ट, राफेलवर उत्तर द्या किंवा राजीनामा द्या, मोदी अंबानींचे चौकीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राफेल वाद प्रकरमी काँग्रेस अद्य़क्ष राहुल गांधींनी गुरुवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. अनिल अंबानींना हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देत त्यांच्या खिशात 30 हजार कोटी टाकल्याचे राहुल म्हणाले. ते देशाचे नाही तर अंबानींचे चौकीदार आहेत, असेही राहुल यावेळी म्हणाले. मोदींना जर भ्रष्टाचारावर उत्तर देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. 


राहुल गांधी म्हणाले, राफेल तयार करणारी कंपनी दैसोचे सिनियर एक्झिक्युटिव्ह आणि फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले आहेत की, अनिल अंबानींना 30% दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या संरक्षणमंत्री फ्रान्सला कशासाठी गेल्या आहेत. अनिल अंबानींवर कर्ज झाले आहे. अशा स्थितीत पंतप्रधानांनी 30 हजार कोटी त्यांच्या खिशात टाकले. तरुण बेरोजगार आहेत आणि पंतप्रधान अंबानींची चौकीदारी करत आहेत. हा तर स्पष्टपणे भ्रष्टाचार आहे. 


रिलायन्सशिवाय दुसरा पर्यायच नव्हता-मॅगझिनचा दावा 
दुसरीकडे फ्रान्सचे मॅगझिन मीडिया पार्टने बुधवारी दावा केला की, रिलायन्स डिफेन्सबरोबर करार करण्याशिवाय दॅसो एव्हिएशनकडे दुसरा पर्यायच नव्हता. दॅसोच्या इंटर्नल डॉक्टुमेंट्सद्वारे याची पुष्टी होते. पण दॅसोने हा दावा फेटाळात कंपनीने स्वतःच रिलायन्सची निवड केली होती असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी दॅसोवर कोणताही दबाव नव्हता असेही स्पष्ट केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...