आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Called Congress Meeting News In Marathi

मतदानाचा खराब फिडबॅक आल्याने राहुल गांधी यांची सहकाऱ्यांसह इमरजन्सी बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दहा एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या खराब फिडबॅकनंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. अंदाजापेक्षा कमी मते मिळण्याचे संकेत या फिडबॅकमध्ये देण्यात आले आहेत, असे वृत्त इंग्रजी डेली मेल टुडेने दिले आहे. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी कॉंग्रेसच्या वरिष्ठांची बैठक झाली. यात पुढील टप्प्यातील मतदानासंदर्भात रणनिती आखण्यात आली. चौथ्या टप्प्यातील मतदानात या रणनितीचा वापर केला जाणार आहे.
गुरुवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मतदान झाले. यातील बहुतांश मतदान कॉंग्रेसच्या विरोधात झाले आहे, असे बहुतांश राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. कॉंग्रेसला मिळालेल्या फिडबॅकमध्येही ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी लगेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलविली आणि पुढील रणनिती आखून आवश्यक आदेश दिले.
कॉंग्रेस पक्षाला मिळालेल्या फिडबॅकमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याचे संकेत मिळाले असून वेळीच पावले उचलली नाहित तर पक्ष निवडणूक रिंगणातून पूर्णपणे बाद होऊ शकतो, असा अंदाज आहे.
गुरुवारी झालेल्या बैठकीत उर्वरित 350 मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आणि रणनिती आखण्यात आली. या सर्व मतदारसंघात केंद्रीय पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत, असे राहुल यांनी सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून काही जागा राखण्याची योजना आहे.
कॉंग्रेसच्या फिडबॅकमध्ये अजय माकन वगळता कुणाच्याही यशाचे निश्चित संकेत नाही, वाचा पुढील स्लाईडवर